sushma andhare angry on rupali chakankar | राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सुद्धा याची दखल घेतली आहे.
आता महिला आयोगाने दखल घेतली असतानाही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सुप्रिया सुळेंबद्दल सत्तार यांनी केलेल्या विधानाचा मीही निषेध करते, पण हा निषेध माझा पक्षाची नेता म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर एक गंभीर आरोप देखील केला आहे. त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मी मंत्री गुलाबराव पाटलांची तक्रार करण्यासाठी दोन वेळा फोन केला होता. पण त्यांनी माझा फोन उचलला नाही.
काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात वाद सुरु होता. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. त्यामुळे मोठा वादही झाला. अशात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर लगेचच तक्रार नोंदवण्यात आल्यामुळे सुषमा अंधारे यांनी महिला आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहे.
मी महिला आयोगावर टीका करत नाही. पण महिला आयोगाला ही बाब लक्षात आणून देतेय की, जर गुलाबराव पाटलांबद्दल आपण ४ दिवस आधीच नोटीस काढली असती किंवा संभाजी भिडेंनाही आपण आधीच नोटीस बजावली असती. तर गुलाबरावांचं प्रकरण घडलं नसतं, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तसेच प्रेम पत्र दिल्यासारखं नोटीशी नका काढू, नोटीशी काढण्याचा अर्थ त्याच्या तक्रारी दाखल झाल्या पाहिजे. त्याचे फॉलोअप घेतले पाहिजे. त्याकडे लक्ष सुद्धा दिलं पाहिजे, असे म्हणत सुषमा अंघारे यांनी महिला आयोगावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
धीरुभाई अंबानींच्या ‘त्या’ घोडचुकीमुळे दोन्ही भाऊ वैरी झाले, कोणती चूक नडली? जाणून घ्या…
Sudha Murti : सुधा मुर्तींना भेटण्यासाठी भिडे बळंच मागे लागले होते, पिच्छाच सोडत नव्हते, म्हणून त्यांना…
वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती; शूजचा फोटो शेअर करत म्हणाला, प्रत्येक खेळाडूला..