sushma andhare angry on chitra wagh | प्रसिद्ध अभिनेती उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चांगलीच चर्चेत असते. पण तिचे अशाप्रकारचे कपडे परिधान करणं हा आता वादाचा विषय ठरला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे.
चित्रा वाघ यांच्या ट्विटला लगेच उत्तर देत उर्फी जावेदने तिच्या स्टाईलने ट्विटरवरच प्रतिउत्तर दिले आहे. त्यात ती म्हणते,
‘आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मूद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?’
तसेच दुसऱ्या रिप्लाय मध्ये ती म्हणते, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?’
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात तक्रार देखील दाखल केली होती. तसेच तिच्याविरोधात चित्रा वाघ रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. पण आता या वादात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहीत चित्रा वाघ यांना धारेवर धरले आहे.
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कंगणा राणावत, केतकी चितळे यांचे फोटो शेअर केले आहे. तसेच यांचे कपडे बघून चित्रा वाघ यांना मारहाणीची भाषा कराल का? असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारेंची फेसबूक पोस्ट-
मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.
कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.
https://www.facebook.com/andhare.sushama/posts/pfbid09FRB7yFdYrcADZbFjv2eSjZJ6KB1DSMyLsGfuMUt3VuThUhqJACuHTdaDwwVzFxQl
महत्वाच्या बातम्या-
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षकच आहेत; इतिहासकारांनी दिले ऐतिहासीक पुरावे
पहिल्या मॅचचा टॉस होताच तुटणार भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे हृदय; कर्णधार पांड्या देणार मोठा धक्का
‘उर्फी जावेदचे थोबाड फोडणार, हा नंगानाच महाराष्ट्रात खपवून घेणार नाही’; चित्रा वाघ कडाडल्या