Share

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची चर्चा असतानाच सुशीलकुमार शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले..

udhav thackeray

राज्यात तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य समोर आलं आहे.

महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या 25हून अधिक आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली माहिती समोर आली आहे. तिन पक्षांचं सरकार असणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आमदारांनी नाराजीचा सूर आवळला आहे.

महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्ष वाया गेल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली आहे. याचाच धागा पकडत या आमदारांनी थेट सोनिया गांधींच्या भेटेची वेळ मागितली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

ते याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. ते म्हणाले, ‘राज्यात जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानायला हवेत. त्यांनी समान किमान कार्यक्रमाचा स्वीकार केला. ते खूप चांगलं काम करत आहेत,” अशी स्तुती सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची केली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत. तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणं कठीण काम आहे. तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत,’ असेही शिंदे म्हणाले. काँग्रेसचं नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. शिंदे म्हणाले, ‘२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमकपणे प्रचार करणारा मोदींसारखा नेता देशाला मिळाला. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. मोदींनी सोलापूरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र एक ही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले.’

महत्त्वाच्या बातम्या
RRR चा धुमाकूळ! कमाईचा आकडा पाहून सलमान खानही झाला चकीत; म्हणाला..
पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याने संतापला पती, सासरवाडीत फेकला बॉम्ब, असा स्फोट झाला की..
बापरे! 1 किलो आंब्याच्या किमतीत येईल नवीकोरी बुलेट; किंमत जाणून व्हाल हैराण, सुरक्षेसाठी ठेवलेत 9 श्वान अन् 3 गार्ड
पोलिसांनी वायरमनचे कापले चालान, बदला म्हणून विद्युत विभागाने पोलिस स्टेशनचे १२ अवैध कनेक्शन कापले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now