सध्या एक सिनेमा प्रचंड चर्चात आहे. तो म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचाराबाबत कथा या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. आनंदाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपा शासित राज्यात द काश्मीर फाइल्स हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या चित्रपटाचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटले आहेत. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. काँग्रेसनं या सिनेमावरून भाजपावर टीका केली आहे. तर‘द काश्मीर फाइल्स’वर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाष्य केले आहे.
अशातच काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने याच चित्रपटावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे याबाबत माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. द काश्मीर फाइल्स चित्रपट अजून पाहिलेला नाही. पण हा चित्रपट पाहीन, असे शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले. ‘काश्मीरवर चित्रपट काढला असेल, तर ठीक आहे. मात्र, त्याआधी एका राणा नावांच्या लेखकांनी गुजरात फाइल्सवर चांगले लेखन केले असून चित्रपट देखील काढलेला आहे. पंतप्रधान मोदींनी त्याचीही प्रसिद्धी करावी आणि बॅलन्स करावे, अशी खोचक टीका शिंदे यांनी केली.
दरम्यान, द काश्मीर फाइल्स या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण अजूनही सुरूच आहे. हा चित्रपट टॅक्स-फ्री करा म्हणणारे भाजप (bjp) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला होता.
आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले होते. राऊत या चित्रपटाबद्दल म्हणाले की, हा चित्रपट काश्मीरवर बनला गेला असला तरी, यातील सत्य लपवण्यात आले आहे आणि या उलट अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पार्थ पवारांचं नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यावर टाकला दबाव, फोन करून म्हणाला, मी आणि पार्थ पवार..
PHOTO: ‘या’ हिंदू अभिनेत्रीने तब्बल चार वेळा केलंय मुस्लिम दिग्दर्शकाशी लग्न, कारण वाचून अवाक व्हाल
बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीन सिद्दीकी संतापला, म्हणाला, एखादी सावळी अभिनेत्री सांगा जी..
मोदींनी प्रयत्न केले तरच संपू शकते रशिया-युक्रेन युद्ध, UN चे चीफ म्हणाले, ‘मी सतत भारताच्या संपर्कात आहे’