Share

पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत, काँग्रेसला घरचा आहेर देत सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

shinde

पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून भाजपला भरघोस यश मिळाले असून कॉंग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाहीये. पंजाबमध्ये ‘आप’ने बाजी मारली आहे.

रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेस संघटना आणखी मजबूत करण्यावर एकमत झाले.

तर आता या निकालाबाबत बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव आणि काँग्रेसची एकूणच राजकीय परिस्थिती यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.

यावर शिंदे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. याबाबत बोलताना शिंदे म्हणतात, शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

शिंदे यांनी याबाबत एका वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. या लेखातून शिंदे यांनी पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खाप हे नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर फोडले आहे. दोघांच्या वर्तणुकीमुळे सरकार येऊ शकले नसल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

दरम्यान, ‘अनेक कठीण प्रसंगात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकार आणि पक्ष टिकवून ठेवला आहे. परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, असे म्हणत शिंदे यांनी सोनिया गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या
20 वर्षांपासून बागेत पडला होता पुतळा; आजची किंमत ऐकून जोडप्याला बसला धक्का
‘या’ आजारामुळे तरुणीने स्वतःच्या शरीराची लावली वाट; चावून, ओरखडून केली भयंकर अवस्था
सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते? ‘झुंड’च्या निर्मात्यांचा थेट सवाल
मी या आयपीएलचा वाट पाहत आहे कारण.., पहिल्यांदाच कर्णधार बनलेल्या हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now