sushama andhare : सुषमा अंधारेंच्या सभेला गुलाबरावांची हजेरी, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ

sushama andhare and gulabrao devkar  | शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. त्या बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. अशातच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात सभा घेतली होती.

ही सभा सुरु असताना या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची एंट्री झाली होती. त्यांना पाहून सगळेच हैराण झाले होते. त्यामुळे आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा मंगळवारी जळगावात पोहचली होती. जळगावात ही यात्रा पोहचल्यानंतर त्यांनी पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात घेतली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचा नेता दाखल झाल्यामुळे सगळेच हैराण झाले होते. गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव देवकर यांचा पराभव करुनच गुलाबराव पाटील हे निवडून आले होते.

अशात गुलाबराव देवकर यांना शिवसेनेच्या सभेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी त्यांनी भाषणही दिले. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. ५०-५० खोके यांच्याकडे आले. पुन्हा पाणीपुरवठा खात यांनी मागून घेतलं. पण यांच्या गावात २५-२५ दिवस पाणी येत नाही, असा टोला देवकर यांनी गुलाबराव पाटलांना लगावला.

तसेच गुलाबराव पाटलांकडून कामं होत नसतील, तर त्यांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. आम्ही उड्डाणपुल बांधला आणि यांनी उद्गाटन केलं. यांनी एक काम केलं असं दाखवून द्या आणि एक लाख रुपये घेऊन, असेही गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Yawaltmal : कारच्या भीषण अपघातात प्रसिद्ध महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू; नवऱ्याने फोडला काळीज चिरणारा टाहो
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सापडला १२ व्या शतकातील ‘खजिना’; उलगडणार अनेक रहस्ये
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…