शुक्रवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्ध असा सामना झाला. मुंबईच्या मैदानावर हा सामना झाला. हा सामना मुंबईने ५ धावांनी जिंकला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला १७८ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गुजरातला ते लक्ष्य पुर्ण करता आले नाही. (surykumar yadav take pill)
अशात या सामन्यातील एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टायटन्सविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. यंदाच्या सिजनमध्ये सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी गुजरातविरुद्ध त्याला काहीही कमाल करता आली नाही. पण त्याने मैदानावर असताना एक पांढऱ्या रंगाची गोळी खाल्ली त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव मधल्या मैदानावर ११ व्या षटकाची सुरुवात होण्यापूर्वी पांढरी गोळी घेताना दिसला. मात्र, ११ चेंडूत तो फक्त १३ धावा करु शकला. राशिद खानने त्याला लवकरच आऊट करुन टाकल्यामुळे गोळीचा काहीच परीणाम दिसला नाही असे म्हटले जात आहे.
मैदानात जेव्हा तो खेळत होता तेव्हा तो अचानक थांबला. त्यावेळी मुंबईच्या एका स्टाफ मेंबरने त्याला एक गोळी दिली होती. जी कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहे.
अशात एका युजरने सूर्यकुमार यादवने व्हाएग्राची गोळी घेतली असल्याचे म्हटले आहे. त्याने ताकद वाढवण्यासाठी व्हाएग्राची गोळी घेतल्याचे युजरने म्हटले आहे. सध्या त्याचे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. पण ही गोळी नक्की कसली होती हे अजूनही समोर आलेले नाही.
Is he taking Viagra to gain more power…#GTvMI #GTvsMI #MumbaiIndians #IPL2022 #IPL pic.twitter.com/TOTjKuNYJd
— Baba Undertaker (@BabaUndertaker) May 6, 2022
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या या अनुभवी फलंदाजाला ११ चेंडूत फक्त १३ च धावा करता आल्या. त्यानंतर ईशान किशन (४५), टीम डेव्हिड (४४) आणि रोहित शर्मा (४३) यांनी गुजरातविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आणि संघाचा स्कोर १७७ धावांपर्यत पोहचवला. मुंबईच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केल्यामुळे गुजरातला हा सामना जिंकता आला नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘बॉम्ब’ने अख्ख जालना शहरच उडवून देणार; इसिसच्या धमकीने राज्यात खळबळ
लग्नाच्या वरातीत डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर हदारले
अंगावर वीज पडली म्हणून तरुणाला शेणाने गुंडाळले, एका तासानंतर नंतर जे घडले ते पाहून सगळेच हादरले