Suryakumar Yadav : आयसीसी क्रमवारीत सुर्यकुमार यादवची मोठी झेप; दिग्गजांनाही दिला धोबीपछाड, ‘या’ स्थानावर मारली उडी

Suryakumar Yadav : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या आपापल्या देशात टी ट्वेंटी मालिका खेळत आहेत. भारतने ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळत विजय मिळवला. २-१ ने भारताने ही मालिका जिंकली. पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड ७ सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे.

यादरम्यान भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवने मोठी झेप घेतली आहे. सध्या आयसीसी टी ट्वेंटीच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वातून सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ३६ चेंडूमध्ये ६९ रन करून सूर्यकुमार यादवने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळत असून त्यामुळेच आयसीसी क्रमवारीत तो वरच्या स्थानावर पोहोचला आहे. क्रमवारीत पहिल्या स्थानावर पाकिस्तानी क्रिकेटरने स्थान पटकावले.

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मायदेशात टी ट्वेंटी मालिकेत तो धावांचा पाऊस पडत आहे. हाच मोहम्मद रिझवान क्रमवारीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये त्याने दोन वेळा अर्धशतक ठोकले.

तर दुसऱ्या स्थानावर असणारा भारताचा सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज मानला जात आहे. सूर्यकुमार यादवला भारताचा मिस्टर ३६० फलंदाज म्हटले जाते. तो कोणत्याही दिशेने शॉट मारू शकतो.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा सूर्यकुमार यादव आयपीएलचे मैदान गाजवतो. कोणत्याही दिशेने शॉट मारण्याचे त्याचे कौशल्य पाहून अनेक क्रिकेटप्रेमी आवाक होतात. या सूर्यकुमारला आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पाहून भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदीत आहेत. सर्वांनी सोशल मीडियावरून सूर्यकुमार यादववर कौतुकाचा पाऊस पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-
health : रोगापेक्षा इलाज भयंकर! वेदनाशामक गोळी घेणं जीवावर बेतू शकतं, काय आहेत दुष्परिणाम?
shinde : मुख्यमंत्री होण्यामागे कुणाची कृपा? शिंदेंनी राजकीय नेत्याचं नव्हे तर ‘या’ व्यक्तीचे घेतलं नाव, अनेकांच्या भुवया उंचवल्या
Street food : पाणीपुरी विक्रेत्यानं पदार्थ तळायच्या झाऱ्याने केलं किळसवाणं कृत्य; घटनेचा व्हिडिओ व्हायरल