suryakumar yadav ruined this three player career | भारतीय संघात जागा मिळवणे खुप कठिण आहे. पण त्यापेक्षाही कठीण आहे ते म्हणजे भारतीय संघात आपली जागा टिकवून ठेवणे. अनेक खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळाली, पण त्यांच्या खराब फॉर्ममुळे त्यांची संघातून हकालपट्टी झाली. पण काही खेळाडू असे असतात जे जबरदस्त खेळीमुळे संघात आपली जागा टिकवून ठेवतात. त्यातलाच एक सूर्यकुमार यादव.
सूर्यकुमार यादवने २०२१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण खुप कमी वेळात त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. सूर्यकुमार हा टी २० क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत दोन टी २० शतकं ठोकली आहे. तर तो त्याच्या ३६० डिग्रीच्या शॉट्समुळेही चर्चेत येतो. पण सूर्यकुमार यादवमुळे तीन खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होत आहे. आज आपण त्यांच्याच बद्दल जाणून घेणार आहोत.
संजू सॅमसन- या यादीत पहिले नाव आहे संजू सॅमनचे आहे. सूर्यकुमार यादवमुळे संजूचे संपुर्ण करिअर उद्ध्वस्त झाले आहे. सूर्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळत नाहीये. संजू हा एक खेळाडू आहे जो सलामीवीरपासून ते फिनिशरपर्यंत कोणाचीही भूमिका निभावू शकतो.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार खेळी केली. या मालिकेत त्याने एकूण ११८ धावा केल्या. तरीही त्याला न्युझीलंडविरुद्धच्या संघात स्थान देण्यात आले नाही. या खेळाडूने भारतासाठी आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत आणि त्यादरम्यान त्याने अनुक्रमे १५६ आणि २९६ धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यर- यादीत दुसरे नाव श्रेयस अय्यरचे आहे, सूर्यामुळे त्यालाही भारतीय संघात संधी मिळणे कठीण झाले आहे. अय्यरचा न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. पण तोही विराट नसल्यामुळे खेळताना दिसून येत आहे.
या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २४ सामन्यात एकूण ९४७ धावा केल्या आहेत, पण सूर्या संघात आल्यानंतर अय्यरला संधी मिळणे बंद झाले. निवडकर्तेही त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. त्याने भारतासाठी ४८ टी-२० सामन्यांमध्ये १०४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे, तर ३३ वनडेमध्ये १२९९ धावा आणि ५ कसोटी सामन्यांमध्ये ४२२ धावा केल्या आहे.
राहूल त्रिपाठी- या यादीत राहूल त्रिपाठीचे नाव सुद्धा येते. ३१ वर्षीय राहूल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही संघात संधी मिळण्याची वाट पाहत आहे. त्याची कामगिरी सुद्धा चांगली आहे. पण सूर्यामुळे त्यालाही भारतीय संघात संधी मिळणे कठीण झाले आहे.
राहुल त्रिपाठीची आयर्लंड, इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने १ टी-२० सामना खेळला होता. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली आहे पण सूर्यामुळे त्याला संधीही मिळाली नाही. राहूलने आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने या सिजनमधील १४ सामन्यांमध्ये १५८ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने एकूण ४१३ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
IND Vs NZ : ‘त्या’ एका चुकीमुळे न्युझीलंडने गमावला हातातला सामना अन् भारताने जिंकली ट्वेंटी मालिका
Nagaraj Manjule: याला म्हणतात खरी मैत्री! बालपणीच्या मित्रासाठी नागराज मंजुळेंनी केलं असं काही की..वाचून कराल कौतूक
Big Boss Marathi : किरण माने घराबाहेर पडताच विकास सावंतची पलटी? अपुर्वा नेमळेकरशी सलगी करत तोंडात भरवला घास