(IND vs SL) भारत विरुद्ध श्रीलंका T20 मालिकेतील दोन सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेवर कब्जा केला आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला.
जिथे यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 230 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. जे पाहुण्या संघाला पूर्ण करता आले नाही आणि केवळ 137 धावा करता आल्या. त्यामुळे हार्दिक पंड्याचा संघ 91 धावांनी विजयी झाला.
सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर भारताने डोंगरासारखे लक्ष्य रचून विजय मिळवला. सूर्याशिवाय आज एकही फलंदाज फॉर्ममध्ये दिसला नाही. सूर्यकुमार यादवने आपल्या झंझावाती खेळीने भारतीय संघाला सामन्यात पुनरागनम करून दिले. त्याने 51 चेंडूत 121 धावांची शतकी खेळी खेळली.
मात्र, सूर्याचे शतक आणि राहुल त्रिपाठी आणि अक्षरच्या झटपट खेळीमुळे भारतीय संघाला 5 विकेट्स गमावून 230 धावांचे विशाल लक्ष्य उभे करता आले. दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी श्रीलंकेचा संघ (IND vs SL) फलंदाजीत फारच खराब झाला.
आपल्या धडाकेबाज खेळीनंतर समालोचकांशी संवाद साधताना, सूर्याने सांगितले की तो प्रत्येक सामन्यात हे शॉट्स कसे काढतो. कर्णधार हार्दिक पांड्याला श्रेय देताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “ज्या पद्धतीने खेळ चालला त्यामुळे मी खूश आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधारा पांड्याने माझ्या फलंदाजीवर विश्वास दाखवला. त्यामुळे हे शतक होऊ शकले.
प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव खूप आनंदी दिसत होता. तसेच, त्याने आपल्या स्फोटक कामगिरीचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. सूर्या (सूर्यकुमार यादव) सामन्यानंतरच्या समारंभात म्हणाला, “माझ्यासाठी स्वत:वर थोडे दडपण दूर करणे आणि सरावाच्या वेळी मैदानावर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करणे खूप महत्त्वाचे आहे
गोष्टी अगदी सोप्या ठेवत मला दर्जेदार कसरत करायची आहे. असे काही शॉट्स आहेत ज्यांचा मी आधीच विचार करतो, परंतु असे शॉट्स देखील आहेत जे मी वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध वापरतो. तो (द्रविड) मला फक्त आनंद घेऊ देतो. तो मला फक्त आनंद घेण्यास आणि व्यक्त होण्यास सांगतो.”
काही शॉट्स आधीच ठरलेले असतात, पण हे असे शॉट्स आहेत जे मी गेल्या एक वर्षापासून खेळत आहे आणि यापेक्षा वेगळे काही करत नाही. 2022 निघून गेले आहे, 2023 मध्ये ही एक नवीन सुरुवात आहे आणि मला आशा आहे की चांगला फॉर्म चालू राहील. खेळपट्टी चांगली होती, उसळी चांगली होती आणि आउटफिल्ड उत्तम होते.
सूर्यकुमार यादव जशी फलंदाजी करत आहे ते पाहून कुणालाही वाटेल की अशी फलंदाजी करावी. आज पुन्हा सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले आणि ज्या स्टाईलमध्ये हे शतक झाले ते खरोखरच पाहण्यासारखे आहे.
सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते वेडे झाले आहेत. या खेळीने सूर्याने क्रिकेट जगताला सांगितले आहे की ट्वेंटी-20 चा एकच राजा आहे आणि एकच राजा असेल. तो म्हणजे सुर्यकुमार यादव. याआधी सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शतक झळकावले होते. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने १११ धावांची नाबाद खेळी खेळली होती.