Share

मुंबई इंडियन्ससोबत टीम इंडियाचेही टेन्शन वाढले, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू संघातून बाहेर

सूर्य कुमार यादव यंदाच्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच नाकारलेल्या मुंबई इंडियन्सपेक्षा टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आहे. डाव्या हाताच्या स्नायूंना दुखापत झालेल्या उजव्या हाताच्या फलंदाजाची दुखापत किती खोल आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.(suryakumar-yadav-out-of-thee-entire-season-due-to-injury-more-tension-for-team-india)

बीसीसीआयचे(BCCI) वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. हा मिडिल ऑर्डर फलंदाज ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची मोठी आशा आहे. भारतीय फलंदाजाने या सिजनमध्ये पाच वेळा चॅम्पियन संघासाठी आठ सामने खेळले आणि तीन अर्धशतकांसह 43.29 च्या सरासरीने 303 धावा केल्या. सामन्यादरम्यान तो जखमी झाला.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, “सूर्यकुमार यादवच्या(Surya Kumar Yadav) डाव्या हाताला ताण आला आहे. तो चालू सिजनमधून बाहेर आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी संपर्क साधल्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

IPL 2022: Why Suryakumar Yadav isn't playing for MI against KKR?

सूर्यकुमार या सिजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून पहिल्या दोन सामन्यातही खेळला नाही. फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या(West Indies) तिसऱ्या आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाली. त्यानंतर तो ‘रिहॅबिटेलायझेशनसाठी’ बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now