Suryakumar yadav : टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे जिथे भारताने T20 मालिका जिंकली आहे तर एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. या मालिकेनंतर, भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाईल जिथे तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळली जाईल.
या दोन्ही मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ह्या मालिकेत सूर्यकुमार यादवला संघातून डच्चू देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमार यादवची या मालिकेसाठी निवड का झाली नाही?
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळल्यानंतर काही खेळाडू बांगलादेशला रवाना होतील. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि इतर अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेतून पुनरागमन करतील, मात्र उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला या मालिकेतून वगळण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्या बर्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे. आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेतही हा खेळाडू संघाचा भाग होता. अशा स्थितीत त्याला विश्रांती देण्याचा निर्णय बोर्डाने (BCCI) घेतला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे, जो 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यासारख्या वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. या सामन्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल तर त्याचे थेट प्रसारण डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल.
बांगलादेश दौरा वेळापत्रक Time Table For Bangladesh Tour
पहिला एकदिवसीय – 4 डिसेंबर, दुपारी 12.30 वा
दुसरी एकदिवसीय – 7 डिसेंबर, दुपारी 12.30 वा
तिसरी एकदिवसीय – 10 डिसेंबर, दुपारी 12.30 वा
पहिली कसोटी – 14 ते 18 डिसेंबर, सकाळी 9.30 वा
दुसरी कसोटी – 22 ते 26 डिसेंबर, सकाळी 9.30 वा
बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ Indian Squad For Bangladesh Tour
एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल
कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव