Share

suryakumar yadav: न्यूझीलंड टी-20 मालिकेनंतर सूर्यकुमार यादवसाठी आली आनंदाची बातमी, हार्दिकचाही मोठा फायदा

suryakumar yadav

ICC T20I Rankings: न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेनंतर टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (suryakumar yadav) एक आनंदाची बातमी आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या T20 क्रमवारीत जगातील नंबर-1 फलंदाज कायम आहे. सूर्यकुमार यादवने आपले अव्वल फलंदाजांचे स्थान कायम ठेवले आहे. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत 50 व्या स्थानावर पोहोचला आहे.

सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी करून क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतून सूर्यकुमार यादवला 31 रेटिंग गुण मिळाले आहेत. 890 रेटिंग गुणांसह तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानपेक्षा 54 रेटिंग गुणांनी पुढे आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद ३० धावांची खेळी करून फलंदाजांमध्ये संयुक्त ५०व्या स्थानावर पोहोचला. गोलंदाजांच्या यादीत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन स्थानांनी प्रगती करत 11व्या स्थानावर तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग एका स्थानाने 21व्या स्थानावर पोहोचला आहे.

फिरकीपटू युजवेंद्र चहल आठ स्थानांनी झेप घेत 40व्या स्थानावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा दिग्गज विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानावर कायम आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत 11व्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) 269 धावांच्या अप्रतिम भागीदारीनंतर फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथनेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या क्रमांकाची बरोबरी साधली.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 106 धावांची खेळी करणारा वॉर्नर एका स्थानाने पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर त्यात 152 धावा करणारा हेड 12 स्थानांनी प्रगती करत 30व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत मिचेल स्टार्क चौथ्या स्थानावर तर अॅडम झाम्पा सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या
प्रेक्षकांसमोर झुकवले मस्तक! हेल्मेटवरील तिरंग्याचे घेतले चुंबन; सुर्याचा भावूक व्हिडीओ व्हायरल

दहशतीचे दुसरे नाव म्हणजे ‘वसिम बशीर’; कश्मीरमधून आणखी एक स्पिडगन टिम इंडीयात दाखल
‘सुर्याच्या आजच्या इनिंगला जगात तोड नाही’; प्रतिस्पर्धी कर्णधार विलियम्सनही झाला नतमस्तक

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now