suryakumar yadav complete 1000 runs in one year | भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. २०२२ च्या टी २० विश्वचषकात त्याच्या बॅटमधून खूप धावा निघत आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. यासह, त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे, जो विक्रम विराट रोहिलाही करता आलेला नाही.
आयसीसी टी २० क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली आहे. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना हैराण करणारे शॉट्स मारले आहे. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूंत ६ चौकार आणि ४ लांब षटकारांसह 61 धावा केल्या.
तसेच या ६१ धावांवर सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने २०२२ मध्ये आपल्या टी २० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये एका वर्षात १००० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
२०२२ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव खुपच घातक फलंदाजी करत आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध ५१ धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावा आणि आता झिम्बाब्वेविरुद्ध ६१ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने टी २० वर्ल्डकप २०२२ च्या ५ डावात २२५ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव गेल्या एका वर्षात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर असलेला सर्वात विश्वासू फलंदाज ठरला आहे. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाला घाम फोडू शकतो. सूर्यकुमार यादव हा लांब षटकार आणि ३६० डिग्रीमध्ये शॉट्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
सूर्यकुमार यादवला भारतीय संघात खुप उशीरा संधी मिळाली. असे असले तरी खुप कमी वेळात त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी टी २० क्रिकेटच्या ३८ सामन्यांमध्ये १२०९ धावा केल्या आहेत, ज्यात एका झंझावाती शतकाचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
Devendra Fadanvis : शिवसेना बेईमान होती, त्यांच्या बेईमानीचा बदला मी घेतला, मला त्याचा आनंद – फडणवीस
India : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय, ‘हे’ खेळाडू ठरले सामन्याचे हिरो
Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक