Share

suryakumar yadav : पाकिस्तानचा माज सुर्याने उतरवला, रिझवानला मागे टाकत बनला टी २० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज

Suryakumar Yadav

suryakumar yadav become number 1 batman in world  | टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो भारतीय संघासाठी शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या या फॉर्मचा त्याला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे तो टी २० क्रिकेटच्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

सूर्यकुमार यादवने मोहम्मद रिझवानला मागे टाकून आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याला पहिल्या क्रमांकावर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. जगातील सर्वोत्तम फलंदाज बनल्यानंतर त्याचे चाहतेही चांगलेच खुश दिसत आहे. तसेच चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतूकही केले आहे.

एकाने म्हटले की, सूर्याने पाकिस्तानचा माज उतरवलाय. तर एकाने म्हटले की स्काय आकाशात पोहचला आहे. तर एक चाहता म्हणाला की, तु खरंच ग्रेट आहेस सुर्या. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, मानलं भावा, तु फक्त दिड वर्षात टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज बनल्याबद्दल तुझं अभिनंदन.

https://twitter.com/Aarohi_pate1/status/1587721421601521664?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587721421601521664%7Ctwgr%5E4b38d73e96051038c16dc229b29356ada285d3b0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-praised-suryakumar-yadav-4%2F

दरम्यान, आयसीसीने २ नोव्हेंबर रोजी ताजी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर पोहचला आहे. सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकून या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

https://twitter.com/hiteshs34167540/status/1587720764681523200?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587720764681523200%7Ctwgr%5E4b38d73e96051038c16dc229b29356ada285d3b0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-praised-suryakumar-yadav-4%2F

मोहम्मद रिझवान बराच काळापासून टी २० मधील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर होता. पण २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करून सूर्याने हे स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपच्या तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली आहेत.

https://twitter.com/pullshot___45/status/1587720685098369025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587720685098369025%7Ctwgr%5E4b38d73e96051038c16dc229b29356ada285d3b0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-praised-suryakumar-yadav-4%2F

दुसरीकडे, टी २० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवान एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सूर्युकमार ८६३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत सूर्याला पहिल्या क्रमांकावर पाहून चाहते खूप खूश झाले आणि त्यांनी त्याच्या फलंदाजीचे जोरदार कौतुक केले.

https://twitter.com/Reishivjadhav/status/1587720613908557824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587720613908557824%7Ctwgr%5E4b38d73e96051038c16dc229b29356ada285d3b0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-praised-suryakumar-yadav-4%2F

https://twitter.com/Ravi55050565/status/1587720729432567810?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587720729432567810%7Ctwgr%5E4b38d73e96051038c16dc229b29356ada285d3b0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-praised-suryakumar-yadav-4%2F

महत्वाच्या बातम्या-
bacchu kadu : मुख्यमंत्र्यांनी काट्याने काटा काढला..! मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बच्चू कडूंना शिंदेंनी दिलं खास गिफ्ट
Dinesh Karthik : स्टंपला चेंडू लागला नाही तरी थर्ड अंपायरने कार्तिकला दिलं धावबाद; चाहते संतापले म्हणाले…
या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा कर्णधार राहणार नाही, BCCI च्या अधिकाऱ्याने दिली धक्कादायक माहिती

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now