Share

Suryakumar Yadav: सिक्सर किंग सुर्यकुमारने एकाच सामन्यात धवनपासून रिझवानपर्यंत सगळ्यांना टाकले मागे, केले ‘हे’ विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टीम इंडियाला केवळ विजयापर्यंत पोहोचवले नाही, तर या सामन्यात आपल्या 3 षटकारांच्या जोरावर त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर त्याने नवा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, सूर्यकुमार यादवने 33 चेंडूंत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी केली आणि त्याने 151.52 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. या 3 षटकारांच्या मदतीने सूर्यकुमार यादव आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकले, त्याने हा विक्रम यापूर्वीच आपल्या नावे केला होता.

सूर्यकुमार यादवच्या आधी हा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मदच्या नावावर होता. रिझवान मात्र आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने आतापर्यंत एकूण 45 षटकार मारले आहेत, तर 2021 मध्ये मोहम्मद रिझवानने 42 षटकार मारले होते.

त्याच वेळी, या प्रकरणात, न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 2021 मध्ये एकूण 41 षटकार ठोकले होते. तसेच वेस्ट इंडिजचा फलंदाज एविन लुईस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2021 मध्ये 37 षटकार मारले होते. इतकेच नाही तर या सामन्यात सूर्यकुमार यादवने शिखर धवनचाही विक्रम मोडीत काढला आणि एका कॅलेंडर वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

या वर्षात आतापर्यंत सूर्यकुमारने एकूण 732 धावा केल्या आहेत तर धवनने 2018 मध्ये 689 धावा केल्या होत्या. पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकात 8 विकेट गमावत 106 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नाबाद 51 आणि सूर्यकुमारच्या नाबाद 50 धावांच्या जोरावर भारताने 16.4 षटकांत 2 बाद 110 धावा करून सामना 8 गडी राखून जिंकला.

याशिवाय एका वर्षात भारताच्या विजयात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या नावावर 511 धावा आहेत. रोहित शर्मा (578 धावा – 2018) आणि विराट कोहली (513 धावा, 2016) त्याच्या पुढे आहेत. सूर्यकुमारच्या कामगिरीने चाहते प्रचंड खुश आहेत आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Arshdeep Singh: क्यूं हिला डाला ना! सोशल मिडीयावर अर्शदीप सिंग गाजला अन् भुवनेश्वर झाला ट्रोल, पहा मीम्स
KL Rahul: सुर्याचा नाद नाय! लाईव्ह मॅचमध्ये केएल राहुलसाठी सुर्याने केले ‘असे’ काम, चाहत्यांकडून होतंय कौतुक
भरमैदानात सूर्यकुमार यादवने घेतली व्हाएग्राची गोळी? व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now