KL Rahul, Suryakumar Yadav, Dinesh Karthik/ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर म्हणजेच काल गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 16 धावांनी मालिका जिंकण्याबरोबरच ही सीरीजही जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टीमचा उपकर्णधार केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघाला जबरदस्त सुरुवात देण्यासोबतच त्याने अप्रतिम अर्धशतकही झळकावले आहे. ज्यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही मिळाला आहे. यानंतर केएल राहुलनी मोठे वक्तव्य केले आहे.
दुसऱ्या T20I सामन्यात केएल राहुलने झटपट अर्धशतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. खरे तर, मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुलने 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पण गुवाहाटीमध्ये, राहुलने आक्रमक दृष्टीकोन घेत, 200 च्या वरच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि शानदार अर्धशतक झळकावले.
राहुलने 28 चेंडूंचा सामना केला आणि 203.57 च्या अप्रतिम स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 57 धावांचे धडाकेबाज अर्धशतक झळकावले. ज्यामध्ये त्याच्या बॅटने 5 चौकार आणि 4 षटकारही मारले आहेत. सामनावीर ठरल्यानंतर भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलने सामन्यानंतरच्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, तो सलामीवीर म्हणून कोणत्या मानसिकतेने खेळतो.
केएल राहुल म्हणाला की, “एक सलामीवीर म्हणून हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सामन्यात काय आवश्यक असते ही मानसिकता आहे ज्यामध्ये मी नेहमीच खेळलो आहे आणि पुढेही खेळत राहीन. वेगवेगळ्या परिस्थितीत स्वत:ची कसोटी पाहण्यात समाधानी आहे. खरे सांगायचे तर, पहिल्या दोन षटकांनंतर माझ्या आणि रोहितमध्ये झालेला संवाद असा होता की चेंडू खेळपट्टीत अडकत होता. आम्हाला वाटले 180-185 हे चांगले लक्ष्य असेल.”
केएल राहुलने आपल्या विधानात पुढे नमूद केले की, त्याला नाही तर सूर्याला सामनावीराचा किताब मिळायला हवा होता. सूर्यकुमार यादवने 277 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 22 चेंडूत 61 धावा केल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. सूर्याच नाही तर केएलने दिनेश कार्तिकचेही कौतुक केले.
केएल राहुल म्हणाला की, “मला आश्चर्य वाटते की मला सामनावीराचा पुरस्कार मिळत आहे, सुर्याला तो मिळायला हवा होता. त्याने खेळाचे रूपच बदलले. दिनेशला नेहमी खूप चेंडूंना सामोरे जावे लागत नाही, तो अपवादात्मक होता आणि पहिल्या चेंडूवर सूर्या आणि विराटनेही बॅकफूट पंच मारून मला सेट केले.
जेव्हा मी विकेटच्या दोन्ही बाजूंनी खेळतो तेव्हा मला कळते की माझ्याकडे चांगला संतुलन आहे. यावरून मला समजते की, माझे डोके स्थिर आहे. भारतात नेहमीच गर्दी असते. संपूर्ण स्टेडियममध्ये क्रिकेट खेळून खूप दिवस झाले आहेत, ते पाहणे खूप छान वाटले.