Share

KL Rahul: सुर्याचा नाद नाय! लाईव्ह मॅचमध्ये केएल राहुलसाठी सुर्याने केले ‘असे’ काम, चाहत्यांकडून होतंय कौतुक

KL Rahul, Suryakumar Yadav, Rohit Sharma, Virat Kohli/ भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाजीचे नायक ठरले. दोघांनी अर्धशतक ठोकले. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. अर्शदीप सिंग आणि दीपक चहरने सामन्याच्या सुरुवातीलाच 5 बळी घेत दक्षिण आफ्रिकेला सावरण्याची संधीही दिली नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही लवकर बाद करण्यात यश मिळवले, पण राहुल आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी केली. 17व्या षटकात सूर्यकुमार यादवने केवळ आपले अर्धशतकच पूर्ण केले नाही तर केएल राहुललाही आपले अर्धशतक पूर्ण करण्याची संधी दिली.

वास्तविक, 16 वे षटक सुरू होण्यापूर्वी सूर्या 39 धावांवर होता, तर केएल राहुल 43 धावांवर होता, परंतु या 360 अंशाच्या षटकात फलंदाजाने दोन चौकार मारले आणि 48 धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे राहुलने 44 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत सूर्याने शेवटच्या षटकात एकेरी धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. केएल राहुलला अर्धशतक पूर्ण करून सामना संपवण्याची संधी देण्यात आली.

केएल राहुलनेही संधीच सोनं केल. त्याने शम्सीला न जुमानता षटकार ठोकून टीम इंडियाला विजय तर मिळवून दिलाच, त्याचबरोबर त्याचं अर्धशतकही पूर्ण केलं. केएल राहुल (51*) आणि सूर्यकुमार यादव (50*) यांनी अर्धशतके झळकावली आणि तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली. भारताने लक्ष्याचा पाठलाग 16.2 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केला.

असाच काहीसा प्रकार 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घडला होता. त्यावेळी विराट अर्धशतक झळकावत खेळत होता, धोनी मैदानात आला, भारताला विजयासाठी एक धाव हवी होती, तो षटकाचा शेवटचा चेंडू होता. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सेलिब्रेशनसाठी तयार होता, त्यामुळे धोनीने फक्त चेंडू रोखला आणि धावा काढल्या नाहीत. त्यामुळे कोहलीला सामना संपवण्याची संधी मिळाली.

महत्वाच्या बातम्या-
अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं लवकरच होणार लग्न? सुनील शेट्टी खुलासा करत म्हणाला..
अथिया शेट्टी आणि केएल राहूल लवकरच करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला…
Hardik Pandya: यावेळी हार्दिक पांड्याने वाचवलं, पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस, चाहत्यांनी विराटला फटकारलं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now