Share

सुरेश रैनाच्या मुलाचे नाव आहे खुपच युनिक, तुम्हीही तुमच्या मुलाला अशी नावे देऊ शकता

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या (Suresh Raina) मुलाचा गेल्या वर्षी जन्म झाला. ही आनंदाची बातमी रैनाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याआधी रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांना एक मुलगीही आहे. मुलाच्या जन्माची बातमी मिळताच रैनोने आपल्या मुलाचे नावही चाहत्यांना सांगितले होते.(Suresh Raina’s son’s name is very unique)

रैनोने आपल्या मुलाला एक अतिशय गोंडस आणि अनोखे नाव दिले आहे. आपल्या मुलाचे नाव शोधण्यासाठी पालकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. काही वेबसाइटवर नावं शोधतात, तर काही मुलांच्या नावाच्या पुस्तकांची थप्पी लावतात. यानंतर, ते आपल्या मुलासाठी परिपूर्ण नाव घेऊन येतात. सुरेश रैनानेही असेच काहीसे केले आहे.  या लेखात, आम्ही तुम्हाला सुरेश रैनाच्या मुलाच्या नावासह त्याचा अर्थ आणि बाळासाठी अशा अनेक नावांबद्दल सांगू.

सुरेश रैनाच्या बाळाच्या नावाचा अर्थ सोशल मीडियावर सुरेश रैनाने सांगितले की, त्याने आपल्या मुलाचे नाव रिओ ठेवले आहे. यासोबतच रैनाने मुलगा आणि पत्नीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. रिओ नावाचा अर्थ स्पॅनिश किंवा पोर्तुगीजमध्ये नदी आहे. रिओ हे ब्राझीलमधील एका शहराचे नाव आहे. रिओ हे स्पॅनिश नाव आहे. जर तुम्हाला रिओ हे नाव देखील आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी हे स्पॅनिश नाव देखील निवडू शकता.

जर तुम्हाला बाळाचे नाव ‘ज’ वरून ठेवायचे असेल तर तुम्ही जुआन असे नाव ठेऊ शकता. जुआन: हे देखील एक स्पॅनिश नाव आहे जे मध्य युगापासून स्पेनमध्ये खूप लोकप्रिय झाले. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव जुआन देखील ठेवू शकता. तसेच ज वरून ‘जोसे’ हे जोसेफचे स्पॅनिश नाव आहे. हे नाव हिब्रूमधून आले आहे आणि जोस नावाचा अर्थ सामील होणे होय. हे नाव अमेरिकेत खूप आवडते.

तसेच तुम्हाला बाळाचे नाव ‘क’ वरून ठेवायचे असेल तर तुम्ही कॅमिलो ठेऊ शकता. तसेच  तुम्ही त्याच्यासाठी इंग्रजी नाव शोधत असाल, तर तुम्ही त्याचे नाव कॅमिलो (Camillo) ठेवू शकता. हे स्पॅनिश नाव कॅमिलस या रोमन नावावर आधारित आहे.

तसेच तुम्हाला बाळाचे नाव ‘ड’ वरून ठेवायचे असेल आणि तुम्ही तुमच्या मुलासाठी इंग्रजी नाव शोधत आहात, मग तुम्ही ‘डेव्हिड’ नाव निवडू शकता. डेव्हिड हे नाव इंग्रजी नावांच्या यादीत नक्कीच दिसते. डेव्हिड नावाचा अर्थ प्रिय, प्रेमाने भरलेला आणि प्रेमळ असा आहे. डेव्हिड नावाचे मूळ हिब्रू आहे.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलीचे किंवा मुलाचे नाव ‘निकोलस’ असे ठेवू शकता. हे मूळ नाव ग्रीक आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी ‘लुई’ हे नाव देखील निवडू शकता. लुई नावाचा अर्थ प्रसिद्धी मिळवणारा योद्धा.

‘ए’ वरून तुम्ही ‘एब्रिल’ नाव ठेऊ शकता. Abril हे नाव मुले आणि मुली दोघांसाठी निवडले जाऊ शकते. Abril नावाचा अर्थ “उघडा” असा आहे. तसेच ‘ए’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव ‘एनरिको’ ठेवू शकता. एनरिको नावाचा अर्थ “घरावर राज्य करणारा” असा आहे.

महत्वाच्या बातम्या
मॅन विथ गोल्डन हार्ट: सुनील ग्रोवरच्या तब्येतीची सलमान घेतोय काळजी, डॉक्टरांना दिला हा सल्ला
मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने साजरी केली पहिली संक्रात, मराठमोळ्या अवतारातील फोटो व्हायरल
शाहरुखच्या समर्थनात उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, आपण इतके बिघडलो आहोत की..
शिवाजी पार्कवर लतादिदींचे स्मारक उभारण्याची भाजपची मागणी; ‘या’ पक्षांनी केला विरोध

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now