बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. पवारांच्या बारामती बलेकिल्ल्याला काही वर्षांपासूनची परंपरा लाभली आहे. पवारांनी उभा केलेला उमेदवार लाखांच्या मतांनी निवडून येतात, हे अवघ्या राज्याने पाहिलंय.
मात्र आता पवारांच्या याच बालेकिल्ल्यावर भाजपची नजर असल्याच पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती जिंकण्यासाठी भाजपने सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या आठवड्यात तीन दिवस बारामती दौऱ्यावर असणारा आहेत.
पवारामुक्त बारामती करण्यासाठी भाजपकडून खूप प्रयत्न केले जात आहेत. मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप बारामतीत प्रचंड ताकदीने उतरली होती. मात्र भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला. आता आगामी निवडणुकांसाठी देखील भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
याचाच धागा पकडत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. आज कामगार मंत्री सुरेश खाडे हे पंढरपुरात आले होते. विठूरायाचं दर्शन घेतल्यानंतर खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामुळे बोलताना खाडे यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकांचा आत्मा असल्याने यांचा पराभव होणार नसल्याच म्हंटले आहे.
पुढे बोलताना खाडे यांनी म्हंटलं आहे की, ‘आगामी निवडणुकांमध्ये बारामती जिंकण्यासाठी भाजप नेते जोमाने कामाला लागले आहेत. याचबरोबर या देशात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला, पण पंतप्रधान मोदी देशातील लोकांचा आत्मा आहेत यामुळे त्यांचा पराभव होणार नाही, त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही”
दरम्यान, आता भाजपने देशाची तिजोरी सांभाळणाऱ्या सीतारामन यांना बारामती पाठवले आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये बारामतीत पवारांच्या बलेकिल्ल्याला भाजप सुरुंग लावणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याचबरोबर आगामी निवडणुकीत बारामतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असणार आहे.