surekha punekar angry on gautami patil | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे चांगलीच चर्चेत असते. अनेक ठिकाणी ती कार्यक्रम करताना दिसत आहे. पण तिच्या नृत्याच्या शैलीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते असे म्हणत तिच्यावर टीका केली जात आहे.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील अंगावर पाणी ओतून अश्लील डान्स करताना दिसली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात एक मृतदेह आढळला होता. त्यामुळेही ती चर्चेत आली होती.
गौतमी पाटीलच्या डान्समुळे तिच्यावर टीकाही केली जाते. याला लावणी म्हणत नाही, असे काही लावणी कलाकार म्हणताना दिसून येतात. आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे गौतमी पाटीलवर टीका केली आहे.
जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते. तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणीसम्राज्ञीकडे कला आहे, तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करणे, स्टेजवर चुकीचे हावभाव करुन नाचणे याला लावणी म्हणत नाही, असे सुरेखा पुणेकर यांनी म्हटले आहे.
तसेच लावणी कलेला योग्यरित्या सादर केले गेले पाहिजे. नाहीतर लोक महिलेला स्टेजवर जाऊन मारतील. जी कलाकार चांगली आहे, तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या. पण जी अश्लील वर्तन करते, जी अपुरे कपडे घालते, तिला तुम्ही अजिबातच स्थान देऊ नका. नाहीतर महाराष्ट्राचा सुद्धा बिहार होईल, असेही सुरेखा पुणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी देखील गौतमी पाटीलच्या लावणीवर वक्तव्य केले होते. आम्हाला माहिती नव्हतं की लावणी अशी असते. आमच्या पूर्वजांना सुद्धा असं काही माहिती नव्हतं. आम्हाला चुकीचं शिकवलं गेलंय, असं आम्हाला आता वाटायला लागलंय, असे म्हणत मेघा घाडगे यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या-
नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातील अभिनेत्याला ५ लाखांचे दागिने चोरल्यामुळे अटक; मुद्देमालही जप्त
वॉशिंग्टन सुंदरने ठोकल्या ६ चेंडूत ३० धावा; सुंदरच्या तुफानात न्युझीलंड उद्धवस्त
Ratan Tata : रतन टाटांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार टाटांची भूमिका