Share

भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

surat

गुजरातमधील बडोद्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या सिटी बसच्या अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. गुजरातमधील बडोद्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मागून आलेल्या सुरत सिटी बसने तिला उडवले होते.

बसखाली चिरडल्यामुळे शिवानी जखमी झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. अपघाताची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शिवानी सोलंकी असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. शिवानी Msc च्या शेवटच्या वर्षांत शिकत होती.

हा अपघात जनमहाल सिटी बस डेपो येथे घडला आहे. धडक बसल्यानं सुरत येथील शिवानी आधी जखमी झाली. अपघातानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. शिवानीच्या मृत्युने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

https://twitter.com/ravipatel5004/status/1501416874546200576?s=20&t=HuZ8K9eHbqCUzCgWtiS1EQ

दरम्यान, ऐन आंतरराष्ट्रीय महिला दिनीच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असल्याप्रमाणे ही तरुणी सुरत शहर बस स्थानकात चालत अस्तानच भरधाव बसने मागून धडक दिली. आणि ती कोसळली, बस तिच्या अंगावरून गेल्याने ती जबर जखमी झाली. आणि तिचा या अपघातात मृत्यू झाला.

या अपघाताचा व्हिडिओ पाहून सर्वच जण हळहळ व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे शिवानीच्या कुटुंबीयांनी चालकावर गंभीर आरोप केले आहेत. सिटी बस चालक जयेश परमार याने बेदरकारपणे गाडी चालवून तिला चिरडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तर दुसरीकडे राज्यात देखील एक भीषण अपघात झाला आहे. मालेगाव-नामपूर मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाप – लेकाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक दुचाकीला धडक देतो आणि त्यानंतर दुचाकीवरील दोघेही खाली कोसळतात. दोघेही खाली कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरुन ट्रकचा मागील टायर गेल्याने बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणणाऱ्यांना दणका! ‘काश्मीर फाइल्स’वर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली
मंत्र्याच्या मुलीचा पळून जाऊन प्रेमविवाह; आता म्हणते मला वडीलांपासून धोका; पोलीसांकडे केली ‘ही’ मागणी
वाराणसीमध्ये ईव्हीएम कुठे नेले जात होते? निवडणूक आयोगाने केला खुलासा
मुख्यमंत्री साहेब..! शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now