Suraj pawar | अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकरीचे अमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आली आहे पण या प्रकरणात सैराट फेम प्रिन्स म्हणजेच अभिनेता सुरज पवार याचे नाव आले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुर्ण राज्यात गाजत आहे.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे तसेच संशितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय क्षिरसागर, आकाश शिंदे, ओमकार तरटे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
मंत्रालायात नोकरीला लावतो असे अमिष दाखवून पाच लाख रुपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तत्काळ आरोपींना अटक केली होती. या तीन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली. या कारणामुळे आता सुरज पवारलाही पोलिस अटक करणार आहेत असं बोललं जात आहे. या प्रकरणात महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के अन् दस्तावेज तयार करणे या कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणांना फसवणाऱ्या या भामट्यांना पोलिसांनी गजाआड केल्यानंतर मोठं रॅकेट असल्याचा संशय वर्तवला जात आहे. दरम्यान, नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकरला काही दिवसांपुर्वी एक फोन आला होता. मंत्रालयातून बोलत आहे असं खोटं त्याला सांगण्यात आलं होतं.
आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी या जागा भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर येईल तेव्हा तीन लाख द्यावे लागतील असं त्याला फोनवर सांगण्यात आलं होतं.
बेरोजगार असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. ४ सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडीच करार झाला होता. पहिल्या वेळी वाघडकर यांनी दोन लाख दिले. तर उरलेली तीन लाख रक्कम नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते. दोन तीन दिवसांनंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथून घेऊन जा असं त्यांना सांगण्यात आलं पण त्यांना संशय आल्याने पोलिसांत धाव घेतली.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Nitish kumar : . .तर मी राजीनामाच देतो, भर बैठकीत मुख्यमंत्र्यांनी झापलं तर संतापला मंत्री, दिली राजीनाम्याची धमकी
Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी