Share

supriya sule : ‘मुकाट्याने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा’; संभाजी भिडेंच्या कुंकवाच्या वक्तव्याचा वाद चिघळला

sambhaji bhide supriya sule

supriya sule criticize sabhaji bhide | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता नुकतीच त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सचिच्छा सुद्धा दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्याचा सल्लाही दिला होता. मंत्रालयात एका महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना एक प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, तु टिकली लाव. अशी आमची भावना आहे. प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं प्रतिक आहे. भारतमाता विधवा नाही, तु आधी कुंकू लाव मग तुझ्या प्रश्नाला उत्तर देतो, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

संभाजी भिडे हे मंत्रालयामध्ये आले होते. त्यावेळी संभाजी भिडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर महिला पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या महिला पत्रकाराने कुंकू लावले नव्हते. त्यामुळे संभाजी भिडे यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे.

महिला पत्रकाराने प्रश्न विचारला, त्यानंतर तिने बुम संभाजी भिडे यांच्याकडे केला. त्यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, तु आधी कुंकू लाव मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यानंतर आता याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना संभाजी भिडे यांना चांगलेच सुनावले आहे. सुळेंनी एक कविता शेअर करत भिडेंवर टीका केली आहे.

ट्विटर पोस्ट-
तू आणि मी ….😊
मी लावतो टिळा,तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात, अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म, तू लाव कुंकू
गुलामीचा शंख, दोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्र, मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा,मनोभावे पाळ

तू घाल बांगड्या, माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर, आमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडी, तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत, जन्मभर चाल

तू घाल अंबाडा, मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला, परंपरेने झाकतो

मी घालतो टोपी, तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!

मी धोतरात, तू शालूत, होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी, महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

https://twitter.com/supriya_sule/status/1588014225343283201?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1588014225343283201%7Ctwgr%5Ed532401169210eeeff62d03052f47d30f201f5c9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmaharashtra%2Fncp-supriya-sule-slams-sambhaji-bhide-over-his-statement-on-woman-a597%2F

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli: विराट कोहलीवर गंभीर आरोप, बांगलादेशविरोधात केली फेक फिल्डींग, पंचांनी दुर्लक्ष केलं नाहीतर..
VIDEO: जड ओझं वाहून नेणाऱ्या हातगाडीला बसचालकाने अशी केली मदत, लोकांचं जिंकलं मन
Rahul Dravid: त्याने बुमराहची कमतरता भासू दिली नाही, राहुल द्रविडने ‘या’ गोलंदाजाला सांगितले भारताचे भविष्य

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now