राजकीय नेते आणि कलाकार यांच्यात एक वेगळेच नाते असते. अनेकदा कलाकार एखाद्या अडचणीत असतात, तेव्हा राजकीय नेते त्यांच्या मदतीला धावून येत असतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी याबद्दल किस्से सांगितले आहे. आता असाच एक किस्सा समोर आला आहे. (supriya pathare share balasaheb incident)
एका मराठी अभिनेत्रीने दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांनीच आपला एकदा जीव वाचवला होता, असे त्या अभिनेत्रीने सांगितले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया पठारे आहे.
सुप्रिया पठारेने बऱ्याच मुलाखती दिल्या आहेत आणि आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. तसेच तिने अनेक मुलाखतींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले आहे. कारण त्यांच्यामुळेच तिचा जीव वाचला होता. आज आपण तोच किस्सा जाणून घेणार आहोत.
सुप्रिया एकदा परराज्यात शुटींगसाठी गेली होती. त्यावेळी एका निर्मात्याने तिला डांबून ठेवलं होतं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिची सुटका केली होती, असा तो किस्सा होता. १९९५ मध्ये बाळासाहेबांनी तिला वाचवलं होतं.
१९९५ मध्ये एक निर्माता शुटींगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथं तीन महिने मला डांबून ठेवलं होतं. महाराष्ट्रातून मी एकटीच त्या युनिटमध्ये होते. पुढं तीन महिने बंदुकीच्या धाकावर त्याने डांबून ठेवलं होतं. मला कुटुंबाशीही संपर्क करु दिला नव्हता, असे सुप्रियाने सांगितले होते.
एकादिवशी मी कसंतरी करुन माझ्या बहिणीला माझ्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी लगेचच माझ्या मदतीसाठी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला आणि माझी सुटका केली. त्यामुळे त्यांची मी सदैव आभारी राहील. त्यांच्यामुळेच माझा जीव वाचला होता, असेही सुप्रियाने सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
श्रृती हसन करतेय ‘या’ भयानक आजाराचा सामना, व्हिडिओ शेअर करत दिली धक्कादायक माहिती
आज माझी मुलगी असती तर..; एकट्या राहणाऱ्या अभिनेत्री रेखाने का व्यक्त केली खंत? वाचा…
असे कपडे सांभाळता येत नसतील तर घालतेच कशाला, बोल्ड ड्रेसवरून फजिती झाल्यावर अंकीता ट्रोल