काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने (ED) ने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. ईडीने देशमुख यांना अटक करतानाच त्यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारून त्यांच्या एकूण 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. पण आता यावरुन सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे.
ईडीने १८० दिवसानंतर देशमुख कुटुंबांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र कायद्यानुसार १८० दिवसानंतर अशाप्रकारे कारवाई करता येत नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार, अनिल देशमुखांच्या पुत्राच्या आणि सुन यांच्या मालमत्ता परत कराव्या लागणार आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत अनिल देशमुखांच्या कुटुबियांना दिलासा दिला आहे. आता त्यांना त्यांच्या मालमत्ताही परत मिळणार आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करत रुपाली पाटील म्हणतात, ‘कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid02DRPGjiwWkDwd78GSHiTPNfTVm8d9znA8fLZxs1wQbSeTvTDNmBRsRevPz2UknUGUl
सध्या त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतं आहे. वाचा काय आहे त्या फेसबुक पोस्टमध्ये… रूपाली पाटील फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘सुप्रीम कोर्टाचा ईडीला दणका. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची व कुटुंबाची ED ने जप्त केलेली सर्व संपत्ती देशमुख यांना परत करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.’
महत्त्वाच्या बातम्या
अखेर इम्रान खानची पंतप्रधान पदावरून झाली गच्छंती, आता तुरुंगात सडावं लागणार? कोण असेल पाकिस्तानचा नवीन पीएम
Video: लॉकअपमध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे, टिकटॉक स्टार अंजली ‘या’ स्पर्धकाच्या पडली प्रेमात, दिली प्रेमाची कबुली
राज ठाकरे जरा वाघोलीचा आदर्श घ्या; मुस्लीम मंदीरात येतात तर हिंदू मशीदीत जाऊन प्रार्थना करतात
शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कट; पोलिसांना अलर्ट दिला होता, मात्र…, समोर आली नवीन माहिती