supreme court : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता लवकरच सुनावणी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येतं आहे. सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना कोणाची, उध्दव ठाकरे यांची की शिंदेंची यावर चर्चा सुरू आहे. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. याच प्रकरणी २७ सप्टेंबरपासून सुनावणी होणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार असल्याच बोललं जातं आहे.
हाती आलेल्या वृतानुसार, सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील जुने प्रकरणं निकाली काढण्यावर भर दिला आहे. विशेष बाब म्हणजे उदय लळित यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणं निकाली काढली आहेत.
तर आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काय निर्णय घेतला जातोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या शिवसेना कोणाची? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. सध्या राज्याच राजकारण चांगलचं तापलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
politics : ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच एक नंबर! पवारांनी थेट आकडेच सांगितले, भाजपचा दावा काढला खोडून
Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष