supreme court desicion on shivsena | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडवली होती. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ५० आमदारही गेले होते. तसेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात जाताना दिसत होते. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
तसेच पक्षाचिन्हावरुन वाद सुरु होता. शिंदे गटाने आपल्याला धनुष्यबाणाचे चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती. कित्येक दिवसांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. अशात सर्वोच्च न्यालयाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोग चिन्ह कोणाला द्यायचे हे ठरवेल असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
ठाकरे गटाने ही याचिका निवडणूक आयोगाकडे जाऊ नये अशी मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळली आहे. चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
निवडणूक आयोग ही घटनात्मक संघटना आहे. त्यांचे विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळं आहे. आरपी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होते. अपात्रेचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कोणताही परीणाम होत नाही, असा युक्तीवाद निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी केले होते.
तसेच निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली, यावर शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. आयोग दोनवेळा मुदतवाढ देऊ शकत नाही, असे कौल यांनी म्हटले होते. पण अपात्रतेचा निर्णय येईपर्यंत आयोगाला थांबायला काय हरकत आहे, असा प्रश्न शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला होता.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाला आतापर्यंत कोणतीही स्थगिती देण्यात आली नव्हती. शिवसेनेच्या बैठकीत बहुमत नसतानाही ठाकरे गटाने अपात्रतेचा निर्णय घेतला गेला. पण निलंबन झाले तरी आयोगाच्या कामकाजावर काहीही परीणाम होणार नाही, असा युक्तीवाद कौल यांनी केला होता. या युक्तीवादानंतर चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.c
महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय अन् शिवसेना हातातून निसटली; पृथ्वीराज चव्हाणांनी आधीच दिला होता इशारा
Eknath Shinde : “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो” – एकनाथ शिंदे
VIDEO: मुलीच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली भावनिक पोस्ट, म्हणाला, माझी मुलगी वेगाने…