Share

Shivsena: शिवसेनेची ‘ती’ मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत दिला मोठा धक्का, शिंदे गटाचा मार्ग झाला सोपा

eknath shinde udhav thakre

shivsena | उद्धव ठाकरे ग्रुप आणि एकनाथ शिंंदे गटात सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाकडे जाणार? याकडे सर्वाचे लक्ष आहे. हे सगळं चालू असताना गुरूवारी ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या दणक्यानंतर ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगाला मनाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे सरकारने केली होती. यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे. शिवसेनेच्या वकीलांनी मागणी केली होती की, कोर्टात सुनावणी असेपर्यंत निवडणूक आयोगानं शिवसेना कोणाची? याबाबत निर्णय घेऊ नये.

निवडणूक आयोगाचे वकील म्हणाले की, एखादा गट मूळ पक्ष असल्याचा दावा करत असेल तर आयोगाला निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा सरन्यायाधीश रामण्णा यांनी आदेश दिले की, निवडणूक आयोगाची सुनावणी थांबवता येणार नाही. निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो पण त्यांनी पण निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये.

आता असं चिन्ह दिसत आहे की, ठाकरे सरकारला आता दोन लढाया लढाव्या लागणार आहेत. एकीकडे निवडणूक आयोगात आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात. यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

या निवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं असे दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहे. पण चिन्ह जर शिंदे गटाला मिळवायचं असेल तर मुळ पक्षासह संसदीय पक्षातही फुट पडली आहे असं त्यांना सिद्ध करावं लागेल. शिंदे गट आणि ठाकरे गटाचीही बाजू मजबूत आहे यात शंका नाही.

शिंदे गटाने या निवडणूकीसाठी आमदार आणि खासदारांपाठोपाठ जिल्हाप्रमुखांनाही आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे मुळ शिवसेना आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटानं प्रतिज्ञापत्रच गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray: बंडखोर आमदाराच्या बहिणीने उद्धव ठाकरेंना दिली हजारो शपथपत्र; म्हणाल्या, ठाकरे कुटुंबावर…
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले
PM Modi: विरोधक पडले विचारात, २०२४ साठी मोदींनी चालवले ब्रम्हास्त्र, ED ला दिले ‘हे’ आदेश, जाणून घ्या समीकरण
आम्ही तिरंगा कधीच स्वीकारणार नाही, संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणाऱ्यांवर RSS ने केली होती केस

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now