Share

मानलं गड्या! ९ कोटींची नोकरी सोडून ‘या’ पोरीने घेतला संन्यास, कारण वाचून कौतुक कराल

जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते, आणि तो आनंद गुरूच्या चरणी मिळतो असे म्हणणारी जळगावची दिक्षा बोरा हिने सध्या संन्यास घेतला आहे. विशेष म्हणजे, तिने तब्बल ९ कोटी रुपयांची नोकरी सोडून संन्यास धारण केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

दिक्षा बोरा प्रचंड श्रीमंत आणि उच्च शिक्षित आहे, सर्व सुखसुविधा असूनही तिने तरुण वयात संन्यास घेतला. ती जळगावची रहिवासी आहे. संन्यास घेतल्यामुळे तिला आता संयमश्रीजी महाराज अशा नावाने ओळखतात. तिने सर्व सुख सुविधा बाजूला सारून वयाच्या २२व्या वर्षी संन्यास घेतला याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

दिक्षा बोरा हिने शिक्षण घेत असताना २०१३ ला जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, आणि तेथूनच संन्याशी जीवन जगायचे असा निश्चय केला. तिच्या या निर्णयाला घरच्यांची परवानगी मिळावी यासाठी तिने तब्बल आठ वर्षे त्यांच्या होकाराची प्रतीक्षा केली.

पुढे पैसाच सर्व काही नसतो, मनाचा आनंद ज्यात आहे तिथे जाणं योग्य असे म्हणत तिने नऊ कोटींची नोकरी सोडून संन्यास घेतला. तिच्या मते, पैशा मागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे.

दिक्षा बोरा बद्दल अधिक माहिती म्हणजे, तिने BBA मधून पुणे येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. दिक्षा बोरा ही राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहे. तसेच शिक्षण घेत असताना क्रीडा, वादविवाद, कला, गायन, संभाषण आधी प्रकारांमध्ये तिने उल्लेखनीय यश मिळवलेले आहे.

नुकतेच, अहमदाबादच्या एका जोडप्यांनी देखील सुखी संसार सोडून संन्यास घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. पतीचं नाव प्रियांक वोहरा आणि पत्नीचं भव्यता वोहरा आहे. प्रियांक वोहरा मोठे व्यापारी होते. त्यांचा संसारही सुखात सुरु होता.

त्यांना दोन मुलं देखील आहेत. वोहरा यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले आहे. यानंतर ७० लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेला त्यांचा ऑटो पार्ट्सचा व्यवसाय वोहरा यांची अवघ्या चार दिवसांत बंद करुन मुलांप्रमाणे संन्यासत्व स्वीकारले.

इतर

Join WhatsApp

Join Now