Share

‘भाजपला पाठिंबा देतो, पण मुंबईचा महापौर आरपीआयचा करा’- रामदास आठवले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएमसी निवडणुकांसाठी मुंबई दौरा सुरू केला आहे. दरम्यान अमित शहा यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असे वक्तव्य केले. याला २४ तास उलटत नाहीत, तोवरच भाजपचे मित्रपक्ष रिपाइंने नवी मागणी केली आहे.

मुंबई दौऱ्यात भाजपच्या मिशन १३५ साठी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना बळ देताना मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असे वक्तव्य केले. मात्र शाहांच्या वक्तव्याला २४ तास उलटत नाहीत, तोवरच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी मागणी केली, जर महापौरपद राखीव असेल तर मुंबईचा महापौर हा आरपीआयचा करावा.

आठवले यांनी विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातील १२ सदस्यांमध्ये आम्हाला एक जागा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. म्हणाले, अमित शाह यांच्या मुंबई महापालिकेतील मिशन १३५ ला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला मुंबई महापालिकेत उपमहापौर पद मिळावे आणि जर महापौरपद राखीव असेल तर मुंबईचा महापौर हा आरपीआयचा करावा.

तसेच म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. आमचे नितीश कुमार कधी इकडे कधी तिकडे असतात आता त्यांना पुन्हा परत भाजपसोबत घेऊ नये कारण त्यांनी धोका दिला आहे, असे आठवले म्हणाले.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरपीआय भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणार आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिंदे सरकार पुढचे अडीच वर्ष टिकणार, त्यानंतर पुढचे पाच वर्ष देखील आमचेच सरकार येणार, असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.

खरी शिवसेना कोणाची यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण शिंदेंनाचा मिळेल, बाळासाहेबांचे नाव घेण्याचे अधिकार ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्यात त्या सगळ्यांना आहे असे आठवले म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now