Share

Vijay Deverakonda: स्वत:चाच चित्रपट पाहण्यासाठी बुरखा घालून पोहोचला ‘हा’ सुपरस्टार, वाचून वाटेल आश्चर्य

Vijay Deverakonda, Promotion, Leaguer/ ‘लिगर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विजय देवरकोंडा खूप उत्सुक आहेत. विजय देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. ‘लिगर’ या गुरुवारी, 25 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता एका मुलाखतीत विजयने एक धक्कादायक आणि अतिशय मजेशीर खुलासा केला आहे.

विजय देवरकोंडा ‘लिगर’पूर्वी अॅक्शन अवतारात दिसला नाही. हा त्याचा पहिला अॅक्शन सिनेमा आहे, ज्यामध्ये तो बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या नवीन मुलाखतीत, विजयने सांगितले की, त्याला कसे कळले की त्याच्या चाहत्यांना त्याला अॅक्शन रोल करताना पाहायचे आहेत. त्यासाठी तो त्याचा तेलुगु चित्रपट ‘डियर कॉम्रेड’ पाहण्यासाठी बुरखा घालून थिएटरमध्ये गेला होता.

Vijay Deverakonda

यादरम्यान, त्याच्या वादग्रस्त दृश्यांवर प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया होती हे त्याने पाहिले. विजय देवरकोंडा म्हणाला, मला नेहमीच अॅक्शन फिल्म करायची इच्छा होती. पण मी फार काळ त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. मी कधी कधी काय करतो, बुरखा घालून थिएटरमध्ये जातो आणि प्रेक्षकांमध्ये बसतो. बुरखा घातलेला एखादा उंच माणूस दिसला तर तो मी असू शकतो.

तो पुढे म्हणाला, मी ‘डियर कॉम्रेड’ पाहण्यासाठी गेलो तेव्हा पाहिले की लोक कोणत्याही वादविवादाच्या दृश्यावर चीअर करत होते, पण माझ्या त्या चित्रपटात भांडण नव्हती. प्रत्येकजण लढत पाहण्यासाठी उत्सुक असायचे, परंतु मी त्यांना ते दाखवले नाही. तेव्हा मला जाणवले की ते माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि मी स्वतःला वेगळ्या नजरेने पाहतो.

‘लिगर’ चित्रपटात विजय देवरकोंडा हा बॉक्सर बनला आहे, जो चाहत्यांना थक्क करेल. अभिनेत्री राम्या कृष्णन त्याच्या आईच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध बॉक्सर असलेला माईक टायसन विजयच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही या चित्रपटाचा एक भाग आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे या चित्रपटाचे डायरेक्टर असून करण जोहर प्रोड्यूसर आहे.

अनन्या आणि विजय ‘लिगर’चे मोठ्या आवाजात आणि वेगळ्या शैलीत प्रमोशन करत आहेत. दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून पाटण्याला गेले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही प्रवास केला. विजय देवरकोंडाची साधी स्टाईलही चाहत्यांना खूप आवडते. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तो साधा टी-शर्ट आणि चप्पल घालून अनेकदा दिसला आहे.

आपल्या कूल स्टाइलमुळे विजय देवरकोंडा वादातही सापडला. एका कार्यक्रमात पत्रकाराशी बोलताना त्यांनी टेबलावर पाय ठेवला होता. याबद्दल त्याला खूप ऐकावं लागलं. ट्रोल्स म्हणाले की अभिनेत्याला एटिट्यूड प्रॉब्लम आहे. मात्र, विजयने नंतर असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. विजयने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट आणि बहिष्काराच्या ट्रेंडबद्दलही सांगितले. यानंतर ट्विटरवर त्याच्या ‘लिगर’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होऊ लागली.

महत्वाच्या बातम्या-
 बॉयकॉटमुळे फक्त आमिरचे नुकसान होत नसून, हजारो कुटुंबाचं नुकसान होतं विजय देवरकोंडा 
Vijay Deverakonda and Rashmika: विजय देवरकोंडा थेट रश्मिकाला म्हणाला, तु खुप सुंदर दिसत आहेस, रश्मिकाही लाजली
करण जोहरच्या त्या प्रश्नावर लाजला विजय देवरकोंडा, म्हणाला, नाही मी हे कधीच केलं नाही
लायगरचा पोस्टर रिलीज, विजय देवरकोंडा दिसून आला न्युड अवतारात; म्हणाला, मी या चित्रपटासाठी सर्व दिलंय

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now