Share

Sunroof: अल्टो आणि वॅगनरमध्येही बसवता येणार सनरूफ; कमी किंमतीत घ्या आलिशान गाड्यांच्या सुविधांचा आनंद

sanroof

सनरूफ(Sunroof): भारतीय बाजारपेठेत सनरूफ असलेल्या कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुण वर्गाकडून अशा गाड्यांना अधिक पसंती दिली जाते. ह्युंदाई कंपनीने यापूर्वी सांगितले होते की, ती त्यांच्या प्रत्येक तिसऱ्या कारमध्ये सनरूफ देत आहे. बहुतेक कंपन्या टॉप मॉडेलमध्येच सनरूफ देतात. बहुतेक कंपन्या केवळ प्रीमियम कार्समध्येच हे फीचर देतात.

भारतीय बाजारपेठेमध्ये ८ लाखांच्या आत एकही कार नाही ज्यामध्ये सनरूफ असेल. भारतात ८ लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या लाखो कार्सची दरवर्षी विक्री होते. या कारमध्ये सनरूफसारखं फीचर नसतं. मात्र आता हे फीचर छोट्या आणि किफायतशीर कार्समध्ये देखील मिळू शकतं. तुमच्याकडे Alto, S-Presso, WagonR, Swift, Kwid किंवा कोणत्याही कंपनीची कार असेल तर तुम्ही त्यात सनरूफ लावू शकता. याची किंमत किमान 30 हजार आहे. त्याचबरोबर कंपनीचे सनरूफ असेल तर त्याची किंमत ही ८० ते ९० हजार रुपये असू शकते.

सनरूफ कसे बसवायचे ते पुढीलप्रमाणे,
कोणत्याही कारमध्ये सनरूफ बसवण्यापूर्वी कारचं मोजमाप केलं जाते. म्हणजेच सनरूफ कुठे बसवायचं आहे. त्यानंतर सनरूफचं मार्किंग केलं जाते. नंतर कारच्या आतील रूफचा भाग वेगळा केला जातो. हा भाग आणि छताचा पत्रा सनरूफच्या आकारात कापला जातो.

त्यानंतर कापलेल्या शीटभोवती सनरूफ फिट केलं जातं. इलेक्ट्रिक सनरूफ बसवल्यास ते बटणाच्या सहाय्याने उघडता येईल किंवा बंद करता येईल. सनरूफची ग्रिप घट्ट असली पाहिजे. ही ग्रिप पाणी आत येण्यापासून थांबवते.

सनरूफ बसवून देण्यासाठी अनेक डीलर्स उपलब्ध आहेत. देशभरातील अनेक बाजारपेठांमध्ये कारमध्ये सनरूफ बसवून देणारे डीलर्स आहेत. दिल्लीत अनेक डीलर्स कारमध्ये सनरुफ इन्स्टॉल करत आहेत. त्याचवेळी मुंबई, बंगलोर, कोलकता यासारख्या अनेक ठिकाणाहून तुम्ही सनरूफ बसवून घेऊ शकता. सनरूफ बसवण्याकरिता 4 ते 5 तास लागतात.

एंट्री ट्रॉपिक 300 वेबस्टो सनरूफची किंमत 22,000 रुपये आहे. त्याचवेळी, त्याचे लेबर शुल्क 8 हजार रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच सनरूफ बसवण्यासाठी 30,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. अशाप्रकारे तुम्ही फक्त 30 हजारात लाखो किमतीचे सनरूफ बसवू शकता.

महत्वाच्या बातम्या

Shivsena: ‘वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू, तोंडाला काळे फासू’; गद्दारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
एकनाथ शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात पडलीय लुळी; मोठमोठ्या वकीलांनाही टेकले हात
Shatrughan Sinha: ‘या’ अभिनेत्रीच होणार होत शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न; पण तिने केल पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न
Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल

तुमची गोष्ट इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now