बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी काही न काही शेअर करत असते. आपल्या ग्लॅमरने सर्वांचे मन जिंकणाऱ्या सनीचा अपघात झाल्याचा प्रकार समोर येत आहे.(Sunny Leone’s accident while shooting)
तिचा दुखापत झालेला एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तिचे चाहते हादरले आहेत. या व्हिडिओमध्ये सनीच्या चेहऱ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सनीची अशी अवस्था पाहून चाहते दु:खी झाले आहेत.
चाहते सनीला तिच्या प्रकृतीविषयी विचारात आहेत. सनीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी लिओनीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. तिच्या पाठीलाही दुखापत झाली आहे.
तिच्या पाठीवर कोणीतरी पट्टी लावत असल्याचेही त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सनीने एजंट एम जखमी.. अनामिका मध्ये काय घडले ते जाणून घ्या. 10 मार्च रोजी MX Player वर रिलीज होणार आहे, असे लिहले आहे.
सनीचा हा व्हिडीओ १६ लाखाहून जास्त लोकांनी पाहिला आहे. एका चाहत्याने या व्हिडीओवर रडणारा ईमोजी पोस्ट केला आहे. सनीला खरोखर दुखापत झालेली नाही. हा तिच्या शूटिंगचा एक भाग आहे.
महत्वाच्या बातम्या
अमिताभ यांच्यानंतर ‘या’ सुपरस्टारसोबत काम करणार नागराज मंजुळे; म्हणाले, मी खूप दिवसांपासून त्यांच्यासोबत..
‘तिला किस करताना मी व्हर्जिनिटी गमावली’, बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा