बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे, ती सनी लिओनी लवकरच एका नवीन मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती ‘आमदार निवास’ या मराठी चित्रपटातील गाण्यावर डान्स करणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या गाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या मराठी चित्रपटात ‘शांताबाई’ नावाचं गाणं असणार आहे . या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. आगामी ‘आमदार निवास’ या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाईच्या रूपाने भेटणार आहे.
सनी लिओनी करत असलेल्या या गाण्याची चर्चा बॉलिवूड मध्ये देखील होत आहे. सनी लिओनीला आधुनिक ‘शांताबाई’ च्या अवतारात पाहायला सगळेच उत्सुक आहेत. याआधी ‘शांताबाई’ गाण्याने 2015 मध्ये महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता.
सनी लिओनीच्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने केले आहे. हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. ‘शांताबाई’ हे संजय लोंढे यांच मूळ गीत असून, हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर दिली आहे.
‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या ‘सनी लिओनी’ ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. ‘आमदार निवास’ हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा हा चित्रपट सनी लिओनी च्या धमाकेदार डान्ससोबत लवकरच येणार आहे.
तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने ‘बॉईज’ या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती.