सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी लग्न बेडीत अडकले आहेत. नुकतेच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न झालं. सेलिब्रिटींचे लग्न चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरते. आता बॉलिवूड अभिनेता सनी देओल याच्या घरी देखील सनई चौघडे लवकरच वाजणार असल्याचं बोलले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरात लवकर लग्न करणार असल्याचं बोलले जात आहे. त्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे अशीही माहिती समोर आली आहे. मात्र याबद्दल देओल कुटुंबीयांनी अद्याप काही माहिती दिली नाही.
सनी देओल याचा मुलगा करण देओल बद्दल सांगायचे झाल्यास, पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये त्यानं पदार्पण केले. मात्र त्याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर बिमल रॉय यांची परपोती द्रिशा हिला करण डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याबद्दलच चर्चा रंगल्या आणि त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची माहिती समोर आली. माहितीनुसार, द्रिशा आणि करण बालपणीपासूनचेच मित्र आहेत. मात्र द्रिशा आणि करणनं साखरपुडा केला की नाही, याबद्दल अद्याप प्रश्न उपस्थित आहेत.
पण, धर्मेंद्र यांची खालावलेली प्रकृती पाहता ही जोडी येत्या काळात लवकरात लवकर लग्नबंधनात अडकू शकतात, असे बोलले जात आहे. कारण, देओल कुटुंबातील एकूण हालचाली पाहता हा तर्क लावला जात आहे. याबद्दल देओल कुटूंबीयांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.
त्यामुळे, आता करण देओल आणि द्रिशा यांच्या लग्नाची व्हायरल होणारी बातमी खरी आहे की खोटी हे येणाऱ्या काळात लवकरच समजेल. जर करण देओल आणि द्रिशा लग्न करणार असतील तर देओल कुटुंब ही बातमी का लपवत आहेत याचे देखील येणाऱ्या काळात उत्तर मिळेल.