Share

Sunil raut : ..त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सुड घेणार, राऊतांच्या इशाऱ्याने खळबळ

sunil raut | संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, शिवसेना फोडून बाळासाहेबांशी गद्दारी करण्याचं शुभ काम शिंदे गटाने केले आहे. त्यापेक्षा वेगळे चांगले काम काय करणार? ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं.

त्या सर्वांचा सुड घेणार असा धक्कादायक इशाराही शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. सुनील राऊत असेही म्हणाले की, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी कोणीही बाळासाहेबांचा उल्लेख केलेला नाही. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

आज बाळासाहेबांना आम्ही उद्धव ठाकरेंच्या रुपात बघतो. बाळासाहेबांच्या पुत्राला वर्षावरून मुख्यमंत्री पदावरून हटवून बाहेर काढलं, ही कसली बेगडी निष्ठा आणि प्रेम आहे. हे उसणं दाखवलेलं प्रेम आहे. जनतेचा मराठी माणसाचा विश्वास शिंदे गटावर नाही आणि ठेवणार नाही, अशी टीका सुनिल राऊत यांनी केली आहे.

पुढे सुनिल राऊत असेही म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कोणी बांधला? बाळासाहेबांनंतर भाजपानं शिवसेनेची युती तोडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली. शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची आहे.

गद्दारी करून जे मिळवलं त्यात खुश राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसवणार आणि ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतवरवलं त्यांचा आमच्या पद्धतीने सुड घेणार असा इशारा सुनिल राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर देखील हे दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह गटाला मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत.

हा सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे गटाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

विधान परिषदेचे प्रधान सचिन राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षास आता अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, अजूनही बेशुद्ध अवस्थेत, समोर आली महत्वाची अपडेट
१६ एकरवर पंगती, लाखो भाविक, ६४ ट्रॅक्टरमधून प्रसादाचे वाटप, ८ दिवस सुरू होती चूल
jalna : वऱ्हाडी बनून आले अन् 390 कोटींची मालमत्ता केली जप्त, आयकर विभागाची धडक कारवाई
Shivsena : “कारकुन, रिक्षावाल्यांना मोठं करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now