पुण्याच्या पोलिस प्रशासनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात सेनापती बापट चौक जंक्शन येथे वाहतूक नियमन करताना पोलिस उपनिरीक्षकाला हृदयविकाराचा झटका आला होता. या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.
सुनील मोरे असे पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते ५७ वर्षांचे होते. सुनील मोरे हे चतुशृंगी वाहतूक पोलिस विभागामध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवारी सेनापती बापट जंक्शन चौकात आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास ते वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी अचानक त्यांचा डावा हात दुखायला लागला. त्यानंतर ते अचाकन चक्कर येऊन खाली पडले. ते अचानक खाली कोसळल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी त्यांना लगेचच रिक्षातून रुग्णालयात नेले.
रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. सुनील मोरेंसोबत असे घडेल असे कोणालाच वाटले नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती. पण अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि हे सर्व घडले. सुनील मोरे यांच्या जाण्याने त्यांच्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुनील मोरे हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांना खात्यांतर्गत नुकतीच पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या कामाचे नेहमीच पोलिस ठाण्यात कौतूक केले जायचे, असे चतुशृंगी वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक बी डी कोळी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना हृदयविकारांनाचा झटका येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. काहीच दिवसांपूर्वी एका शिक्षकाचा शाळेत शिकवत असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. ४३ वर्षीय सुरेश राऊत हे शिकवत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
चिंचवडच्या पोटनिवडणूकीवरुन जगताप कुटुंबात वाद? रस्त्यावर सुरु झालाय पोस्टर वॉर
राष्ट्रवादीत पुन्हा उभी फूट! पुण्यातील ‘हा’ दिग्गज आमदार जाणार शिंदे गटात? स्वतःच म्हणाला की..
फक्त अदानीच नाही तर जगातील ‘या’ सहा गर्भश्रीमंत लोकांची संपत्तीही झपाट्याने होतेय कमी, पहा यादी