इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 चा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. या आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. यावर्षीची आयपीएल रंगतदार असणार आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये कोण जिंकणार याबद्दल चर्चा होत आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केलेला दावा चर्चेत येत आहे.
सुनील गावस्कर यांनी आयपीएल सुरू होण्याच्या आधी मोठा दावा केला होता. तो दावा म्हणजे आयपीएलमध्ये यावर्षी एक फलंदाज 900 पेक्षा जास्त धावा करेल. त्यांनी केलेला हा दावा खरा ठरेल का याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांनी ज्या फलंदाजाबद्दल बोलले आहे, तो देखील हा दावा खरा ठरवणार का याबद्दल बोलले जात आहे.
आता सुनील गावस्कर यांनी केलेला हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कोणा संदर्भात नसून, भारतीय प्रसिद्ध फलंदाज विराट कोहली याच्या संदर्भात आहे. गावस्कर यांच्या मते, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा कर्णधार बदलल्यामुळे विराट कोहली 2016 च्या हंगामाप्रमाणेच खेळू शकतो.
म्हणाले, 2016 च्या हंगामात विराटने 900 हून अधिक धावा केल्या होत्या, आता आयपीएलच्या या वर्षीच्या हंगामात देखील तो 900 हून अधिक धावा करेल, असा मला विश्वास आहे असे म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे विराटच्या चाहत्यांमध्ये याबद्दल चर्चा होत आहे.
तसेच म्हणाले, कोहली पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल की नाही, हे सध्या तरी आम्हाला माहीत नाही. कधीकधी जेव्हा एखादा खेळाडू कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होतो तेव्हा तो इतर 10 खेळाडूंचा विचार करत नसल्यामुळे तो चांगली कामगिरी करतो, असे आयपीएलचे अधिकृत प्रसारक ‘स्टार स्पोर्ट्स’च्या ‘गेमप्लान’ या एपिसोडमध्ये बोलताना गावस्कर म्हणाले.
नुकताच सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना एक भविष्यवाणी केली होती की, मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू शकते. सामना कसा जिंकायचा हे मुंबईच्या टीमला माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी याआधी हरलेले सामने जिंकले आहेत. प्रत्येक हंगामात ते संथ सुरुवात करतात, पण यावेळी टीमची संख्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त वेळ असेल. असे ते म्हणाले होते.






