कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील लतिका आणि अभ्याच्या जोडीला प्रेक्षक खूप पसंती देत असतात. तसेच इतर मालिकेतील इतर कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत असतात. यादरम्यान या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती द्रविडने मालिका सोडल्याचे वृत्त समोर येत आहे.
नंदिनी अर्थात अदिती द्रविडने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने मालिका सोडल्याची माहिती दिली आहे. मालिकेत तिचा ट्रॅक संपल्याने मालिकेचा निरोप घेत असल्याचे अदितीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इन्स्टाग्राम हँडलवर अदितीने काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो म्हणजे पहिल्यांदा नंदिनी या भूमिकेसाठी तयार होण्यादरम्यानचे असल्याचे, अदितीने पोस्टमध्ये सांगितले आहे.
फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘नंदिनीचा प्रवास २७ ॲागस्टला सुरू झाला होता आणि खरतर ती फक्त २ महीन्यांसाठी आली होती! पण बघता बघता २ चे ६ महीने कधी झाले कळंलच नाही. आणि हे, केवळ तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच शक्य झालं!! नंदिनीला औपचारिक बाय-बाय म्हणायचं राहिलं होतं. म्हणून आज २७ तारखेला ही पोस्ट करतीये’.
यासोबत अदितीने नंदिनी ही भूमिका मिळाल्याबद्दल ती खूपच कृतज्ञ असून ती नंदिनीला मिस करत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या संपूर्ण टीमचेही आभार मानले. अदितीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तेसुद्धा नंदिनीला मिस करत असल्याचे म्हटले आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेपूर्वी अदितीने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने शनायाची मैत्रीण इशाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. याशिवाय तिने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत त्यांची मोठी बहिण तुळसा ही भूमिका साकारली होती.
अदितीशिवाय इतरही काही कलाकारांनी गेल्या काही दिवसात मालिका सोडली आहे. मालिकेत कामिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा पुरंदरेने मागील वर्षी ही मालिका सोडली होती. तसेच अभ्याच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणिती नरके, दिग्गज अभिनेते धनंजय वाबळे, लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी किरण यांनीही मालिकेतून निरोप घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
प्राजक्ता गायकवाडने जेजुरी गडावर घेतले खंडेरायाचे दर्शन; नंतर म्हणाली, भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक….
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड रणबीरची काय प्रतिक्रिया होती? आलिया भट्ट म्हणाली..
PHOTO: पिवळ्या साडीमध्ये मौनी रॉयला पाहून चाहता घायाळ; म्हणाला, ‘तुझ्यासारखं या जगात कोणीच नाही’