Share

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करत असलेल्या सासूला जावयाने ढकलले विहीरीत, सासूचा बुडून मृत्यु

विहीर

कौटुंबिक वादातून जावयाने सासूला विहीरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वडेगाव येथे ही घटना घडली आहे. जावयाने रागाच्याभरात सासूला विहिरीत ढकलून दिले. विहिरीत पडल्यामुळे सासूचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.(sun in law pushes mother-in-law to mediate in husband)

या प्रकरणी बाळापुर पोलीसांनी वृद्धेच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अंधारसांगवी येथील मूळ रहिवाशी असलेले बळीराम डाखोरे हे परिवारासह वडेगाव येथील शेतकरी ढोरे यांच्या शेतात काम करत होते.

त्याच शेताच्या बाजूला एक शेत होते. त्या शेतात यांचा जावई विकास मारोती इंगळे हा सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात काम करत होता. त्यावेळी जावई आणि सासु यांच्यात छोटीशी वादावादी सुरु झाली.

छोट्याश्या कारणावरून झालेल्या वादावादीत ७ जानेवारीला चंद्रकला बळीराम डाखोरे या महिलेला तिच्या जावयाने विहिरीत ढकलून दिले. विहिरीच्या पाण्यात बुडून चंद्रकला डाखोरे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर बळीराम डाखोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीवरून बाळापूर पोलीसांनी मृतक महिलेचा जावई असलेल्या विलास मारोती इंगळे, याच्याविरुद्ध पोलीसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलीसांचा पुढचा तपास चालू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावई विलास आणि त्याच्या पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीमुळे एकमेकांशी ते दोघे बोलत नव्हते. त्यामुळे सासू चंद्रकला यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र रागात असलेल्या जावयाने त्यांना विहिरीत ढकलून दिले. विहिरीत पडल्यामुळे सासू चंद्रकला यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या
शिवाजी पार्कमध्ये लतादिदींचे स्मारक करण्याबाबत ह्रदयनाथ मंगेशकरांनी दिली प्रतिक्रीया, म्हणाले कृपया..
VIDEO: सोनू सूद पुन्हा बनला देवदूत; अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उचलून रुग्णालयात केले दाखल

क्राईम

Join WhatsApp

Join Now