आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे वेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आले आहे. सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी सिद्धू यांच्यावर जाहीरपणे गंभीर आरोप केल्याने कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ( Suman Toor Alleges Navjot Singh Sidhu )
सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी आज चंदिगडमध्ये पत्रकार परिषद घेतली. सिद्धू यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आपले आईवडील वेगळे झाले होते, असा दावा केला. तसेच सिद्धू ही व्यक्ती अत्यंत निर्दयी आहे आणि त्यांनी कुटुंबातील इतरांचा छळ केला हेच सत्य असल्याचा दावा सुमन यांनी केला. बहिनेने केलेल्या दाव्याने सध्या सिद्धू हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
तसेच वडील भगवंत सिद्धू यांच्या निधनानंतर सिद्धूंनी आई निर्मल भगवंत आणि बहिणींना घरातून हाकलून लावले होते, असे सांगत सिद्धूची बहीण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर आरोप केले. याचबरोबर सिद्धूंनी त्यांच्या आईकडून संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांच्या आईला बेघर केले, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, त्या म्हणाल्या की, सिद्धूंनी लोकांशी खोटे बोलले आहे. सिद्धू दोन वर्षांचे असताना त्यांचे पालक वेगळे झाले होते, हे सिद्धूंचे विधान खोटं आहे. सुमन तूर यांनी सांगितले की, त्यांच्या आईचा दिल्ली रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत मृत्यू झाला होता. सुमन सांगतात मी नवज्योत सिद्धू यांना त्यांच्या अमृतसर येथील घरी भेटायला गेल्या होत्या, पण सिद्धूंनी गेट उघडले नाही. त्यांचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.
सुमनने सांगितले की, माझी आई आणि बहीण या जगात नाहीत, पण मी अजूनही जगण्यासाठी खूप मेहनत करत आहे. नवज्योत सिद्धूची सासू जसवीर कौर यांनी आमचे घर उद्ध्वस्त केले. मी माझ्या वडिलोपार्जित घरी कधीही जाऊ शकले नाही, असे सुमनने यावेळी येथे बोलताना येथे सांगितले.
तसेच यावेळी सुमन तूर यांना जेव्हा विचारण्यात आले की, इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या वेळी त्या आरोप का करत आहेत, तेव्हा त्या म्हणाल्या की, मला नुकताच एक लेख दिसला, ज्यात नवज्योत सिद्धू यांनी आई आणि वडील वेगळे झाल्याचे आणि बहिणींशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. यामुळेच मी आता हे आरोप करत आहे, असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
दारूच्या नशेत स्वत:च्याच मुलीवर करत होता बलात्कार, पत्नीने हातोड्याने केला पतीचा खून
जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीट चर्चेत; “बापाची जात बंधनकारक का? आई हा…”
“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”
‘थंडीने गोठून मुलं मरणार नाहीत ना? या भितीने मी पुर्ण रात्र जागून काढतो’, पित्याची कहाणी वाचून डोळ्यातून येईल पाणी