स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत देवकी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod). मालिकेत मीनाक्षी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येते. नुकतीच मीनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. तिच्या या बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. काय आहे ती गुड न्यूज जाणून घेऊया.
मीनाक्षी राठोड लवकरच आई होणार आहे. लवकरच तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असून यासंदर्भात तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. मीनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या डोहाळे जेवणादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मीनाक्षी फुलांनी सजलेल्या झोपाळ्यावर बसून फोटोसाठी पोझ देताना दिसून येत आहे.
हिरवा आणि निळ्या रंगाचा घागरा आणि त्यावर फ्लोरल ज्वेलरी अशा लूकमध्ये मीनाक्षी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसून येत आहे. या फोटोंसोबत तिने लिहिले की, ‘होय! आम्ही प्रेग्नेंट आहोत’. यानंतर मीनाक्षीने काही व्हिडिओसुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये ती डोहाळे जेवणासाठी साजशृंगार करताना दिसून येत आहे.
मीनाक्षीने ही गुड न्यूज शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत मीनाक्षी आणि तिचा पती कैलाश वागमारेला शुभेच्छा देत आहेत. सुयश टिळक, गिरीजा प्रभू, अश्विनी कासार, पुलवा कामकर या कलाकरांनाही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मीनाक्षी राठोड ही मूळची जालन्याची. मीनाक्षी तिच्या वडिलांमुळे कलाक्षेत्राकडे वळाली. तिच्या वडिलांना कलेची आवड असल्याने ते तिला नाटक, नृत्य अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सांगायचे. महाविद्यालयात शिकत असण्यादरम्यान मीनाक्षी युथ फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्यायची.
मुंबईत आल्यानंतर मीनाक्षीला खऱ्या अर्थाने अभिनयाचे धडे मिळाले. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक नाटक आणि लघुपटात काम केले. तिच्या ‘खिसा’ नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मीनाक्षीचा नवरा कैलाश वाघमारेसुद्धा उत्तम अभिनेता आहे. दोघेही कॉलेज जीवनापासून अभिनयास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या :
तु माझ्या आयुष्यात आलास आणि..; निवेदिता सराफ यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट
बाळाचा लंगोट बदलण्यापासून ते माझ्या.., उर्मिला निंबाळकरची पतीबाबतची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary : देबिना-गुरमीत झाले आई-बाबा; अभिनेत्याने शेअर केला लाडक्या मुलीचा पहिला व्हिडिओ