स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta?) या मालिकेतील देवकी अर्थात अभिनेत्री मीनाक्षी राठोड आई झाली आहे. मीनाक्षीने नुकतीच एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ‘मुलगी झाली हो’ अशा शब्दात तिने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला आहे. मीनाक्षीची ही आनंदाची बातमी समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
मीनाक्षी राठोडने मागील महिन्यात तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. तर प्रेग्नेन्सीची घोषणा केल्यापासूनच ती माध्यमात फारच चर्चेत आली. प्रेग्नेन्सीदरम्यान मीनाक्षी अनेक बोल्ड फोटोशूट करताना दिसून आली होती. यावेळी मीनाक्षीचा पती कैलाश वाघमारेसुद्धा तिच्यासोबत होता. तर तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी मीनाक्षीने नवीन कार खरेदी केल्याची माहिती दिली होती. तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती कैलाश वाघमारे आणि कारसोबतचा तिचा एक फोटो शेअर करत ‘दोनाचे चार झालो’ असे कॅप्शन दिले होते. त्यानंतर आता मीनाक्षी आणि कैलाशच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाल्याने दोघेही फारच खुश आहेत.
दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत आपल्या विनोदी अभिनयाद्वारे मीनाक्षीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर काहीच दिवसांपूर्वी तिने मालिकेतून ब्रेक घेतला. मीनाक्षी अगदी नवव्या महिन्यांपर्यंत काम करताना दिसून आली होती. तर आता तिच्या जागी मालिकेत अभिनेत्री भक्ती रत्नपारखी देवकी ही भूमिका साकारत आहे.
दरम्यान, मीनाक्षी राठोड ही मूळची जालन्याची. मीनाक्षी तिच्या वडिलांमुळे कलाक्षेत्राकडे वळाली. तिच्या वडिलांना कलेची आवड असल्याने ते तिला नाटक, नृत्य अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सांगायचे. महाविद्यालयात शिकत असण्यादरम्यान मीनाक्षी युथ फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्यायची.
मीनाक्षी मुंबईत आल्यानंतर तिला खऱ्या अभिनयाचे धडे मिळाले. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक नाटक आणि लघुपटात काम केले. तिच्या खिसा नावाच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मीनाक्षीचा नवरा कैलाश वाघमारेसुद्धा उत्तम अभिनेता आहे. दोघेही कॉलेज जीवनापासून अभिनयास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या :
काश्मिर फाईल्समुळे सिंगापुरमध्ये उडाला गोंधळ, बंदी घालण्याची तयारी सुरू, वाचा नेमकं काय घडलं?
बॉलिवूडला मी परवडणार नाही असं म्हणणारा महेश बाबू कमावतो तरी किती? वाचून अवाक व्हाल
चित्रपट निर्मात्यांनी वडिलांचे 1.25 कोटी बुडवले, अमजद खान यांच्या मुलाने सांगितले किस्से