Share

Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”

nilesh lanke

sujit zavare allegation on nilesh lanke |     कोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी लोकांना केलेली मदत नागरिक आजपर्यंत विसरु शकलेले नाही. कोरोना काळात निलेश लंके हे अनेकदा कोविड सेंटरमध्ये झोपल्याचे दिसून आले. पण त्यांच्या या मदतीवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. आता पुन्हा निलेश लंके भाजपच्या निशाण्यावर आले आहे.

कोरोना सेंटरच्या नावाखाली काही लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला. त्या पैशातूनच लोकांची मते मिळवण्यासाठी मोहटादेवीचे दर्शन घडविले होते. सुपे एमआयडीसीतून हफ्ते गोळा करुन तसेच त्या पैशाचा वापर तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी केला जातो, असे भाजपचे नेते सुजित झावारे यांनी म्हटले आहे.

तसेच मलाही लोकांना देवदर्शन घडवून आणावे वाटते, पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा, असे म्हणत मागील अडीच वर्षात फक्त जाहिरातबाजी झाली. एकतरी मोठे काम दाखवा, अशी टीका झावारे यांनी अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांच्यावर केली आहे. त्यांनी यावेळी लंकेंचे नाव घेणे टाळले आहे.

कोणतेही काम न करता त्यांची जाहिरात बाजी करुन श्रेय घेण्याचे काम सध्या तालुक्यात सुरु आहे. जलजीवन मिशनसाठी आलेल्या निधीचे श्रेय हे खासदार सुजय विखे पाटील यांचेच आहे. पण विरोधक जाहिरातबाजी करुन असे दाखवत आहे, जसं त्यांनीच हा निधी आणला, असे सुजित झावरे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना सेंटरच्या नावाखाली त्यांनी अफाट माया जमवली. त्या पैशाचा वापर आता ते करताना दिसून येत आहे. देवदर्शन फक्त राजकीय हितासाठी आणि मतांसाठी आहे. हे जनतेला माहिती आहे. मागील अडीच वर्षात तालुक्यात एकही मोठे काम झालेले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सरकार आहे, त्यामुळे विकासकामे आमच्या सरकारच्या माध्यमातून होताय.

पवार कुटुंबाशी खुप जवळचे संबंध असल्याचे दाखवले जात आहे. मग त्यांच्या जवळीकतेचा फायदा जनतेला का करुन देत नाही. त्यांच्या माध्यमातून एखादे विकासकाम तालुक्यासाठी का केले नाही. ते सत्तेत असताना एकही मोठी विकास कामे येथे झाले नाही, असे सुजित झावरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
udhav thackeray : उद्धव ठाकेरेंच्या अडचणी वाढणार? तेलगी स्टॅम्प घोटाळ्यासारखाच बडा घोटाळा आला समोर
shivsena : …त्यामुळे भाजपने कितीही आपटली तरी अंधेरीत शिवसेनेचाच विजय होणार; ‘असे’ आहे मतांचे गणित
‘भाजपला जसे उद्धव ठाकरे नको आहेत तसेच एकनाथ शिंदेही नकोच आहेत, ते फक्त…’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now