Share

राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाला पाठिंबा, पण त्याआधी अमित ठाकरेंना…; आंबेडकरांनी ठाकरेंना दिलं खुलं आव्हान

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर दुप्पट लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता.

यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे.

समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. “राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी”, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

याबाबत बोलताना ते म्हणाले, “सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका,” असे आवाहन त्यांनी राज ठाकरेंना केले आहे.

दरम्यान, मशिदींवरील बेकायदा भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लाऊ असा इशारा राज ठाकरेंनी सभेत दिला. त्यानंतर आज घाटकोपरमधील मनसैनिकांनी पक्षाच्या कार्यालयावर लाऊड स्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला. दिवसभर हनुमान चालिसा सुरुच राहणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शिकार करण्यासाठी घरट्यात घुसलेल्या सापाला पक्षांच्या जोडीनं दिलं ‘असं’ उत्तर; व्हिडीओ प्रचंड व्हायरल
राज ठाकरेंच्या भाषणावर MIM च्या इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज ठाकरे….
अजित पवारांचा राज ठाकरेंना ‘दादा’ स्टाईलने टोला; म्हणाले वाह रे पठ्ठ्या, जेव्हा…
२२ वर्षाच्या तरुणीने घरी सांगितलं पार्लरला जातेय, अर्ध्या तासानंतर जे झालं ते ऐकून संपूर्ण कुटूंब हादरलं

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now