2 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर पडसाद अजूनही उमटत आहे. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच वातावरण तापलं असताना आता प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
यावेळी त्यांनी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही गंभीर टीका केली आहे. ‘दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात,” असे सुजाता आंबेडकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना टे म्हणाले, “राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे,” असेही सुजात म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानावर सुजात आंबेडकरांनी टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं होतं. सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं होतं.
“राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी”, असं खुलं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं होत. आता पुन्हा एकदा सुजात यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येतीये, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयानक! जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात घातला रॉड, अटक झाल्यावर म्हणाला..
रेखाला सेक्स-मॅड समजायची तिची सासू, ‘या’ अभिनेत्यासोबत लग्न केल्यानंतर सहन केला आतोनात त्रास
जेव्हा सैफने उडवली कपूर कुटुंबाची खिल्ली, म्हणाला, मी तर कमी लोकांमध्ये लग्न उरकणार होतो पण..
मृत्युनंतर आपल्या मुलांसाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले कादर खान, वाचून अवाक व्हाल