काही दिवसांपासून मनसेत नाराजी नाट्यास सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भुमिकांवर बोट ठेवत अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर मनसेला लागलेली गळती पक्षासाठी धोक्याची ठरली जाऊ शकते असं बोललं जातं आहे.
तर दुसरीकडे राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक आहे. मात्र अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही.
मात्र मनसे कार्यकर्ते सभा घेण्यावर ठाम आहेत. “पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा”, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. असे असले तरी, आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. चार महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत कारणांमुळे दशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले.
तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच सांगितलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या विधानावरून राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. मनसे विरुद्ध अनेक पक्ष असा सामना सध्या रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत राज्यातील अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
ज्या मनसैनिकांचा राज ठाकरे यांनी एकेकाळी सत्कार केला होता, त्या मुंबईसह मराठवाड्यातील 35 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर या माजी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरें यांना चॅलेंज दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
‘एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर…’, राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी…”; औरंगाबादमधील राज गर्जनेचा टीझर रिलीज; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
ठाकरेंना नडणाऱ्या राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा; विरोधकांसाठी इशारा
राज ठाकरेंची सभा रद्द करावी लागणार? औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी; सरकारचा कठोर निर्णय