Share

shinde group : “हिंमत असेल तर बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा आणि…”; शिवसेनेचे ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray Santosh Bangar

shinde group : शिंदे गटात सामील झालेले संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर ठाकरे गट आणि बांगर यांच्यात वादाची ठिणगी पडली. या हल्ल्यानंतर आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.

काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील अंजनगावं सुर्जी नेहरू चौक येथे संतोष बांगर यांचा ताफा अडवून बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या या हल्ल्यात बांगर यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी म्हंटलं आहे की, संतोष बांगरवर हल्ला करायला वाघाचं काळीज लागतं. असा चोरासारखा हल्ला करणारे शिवसैनिक कसले? डाका काय असतो माहिती आहे का? असा संतप्त सवाल बांगर यांनी उपस्थित केला केला. यावर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. सुर्यवंशी म्हणतात की, ‘माझे आव्हान आहे, की तुम्ही कधी, किती लोकं घेऊन येता आम्हाला सांगा. वेळ, ठिकाण आणि तारीख त्यांनी सांगावी. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कोण तेव्हा तुम्हाला दाखवू.’

तसेच ‘हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा. तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो. दुसऱ्या दिवशी खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये,’ असं सुर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटातील नेते बांगर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. यामुळे सध्या बांगर आणि ठाकरे गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now