स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सगळीकडे अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारचा नुकतीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Sudhir Mungantiwar’s big decision to say ‘Vande Mataram’)
शिंदे सरकारमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना वनविभाग तसे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. सांस्कृतिक मंत्रालयाचा पदभार सांभाळण्यास सुरुवात केल्यावर पहिल्या ४ तासातच त्यांनी आता फोन उचलल्यावर हॅलो.. ऐवजी यापुढे वंदे मातरम्.. असे म्हंटले जाईल हा निर्णय घेतला.
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. परंतु हा निर्णय घेतल्यावर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘१ जानेवारीपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत देशभक्ती संपणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.’
‘आपण आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द वापरत आहोत. तो म्हणजे हॅलो.. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता. तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी झेंडा हातात घेत, वंदे मातरम् म्हणत देशाचं स्वातंत्र्य मंगलकलशच्या रूपात तुमच्या- आमच्या हातात दिलं.’
पुढे ते म्हणाले की, ‘इतकी वर्षे उलटून गेली तरी देखील इंग्रजांची छाप काही कमी होत नाही. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून मी संकल्प केला आहे की, यापुढे महाराष्ट्रात हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हंटले जाईल.’
‘स्वातंत्र्याचे गीत वंदे मातरम् हे अभियान सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आम्ही प्रत्येक जिल्ह्यात राबवणार आहोत. तुम्ही पण असा संकल्प करा की, यापुढे कोणाचाही फोन आला अथवा तुम्ही केला तर हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोला,’ असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी सामान्य जनतेला केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर…
अंत्यदर्शनावेळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले…
विनायक मेटे यांच्या अपघाताबद्दल अजित पवारांची वेगळीच शंका; म्हणाले, रात्रभर चालकाने….